बिहारचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ या घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि इतर १४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. यादव यांची मुलगी मीसा भारती यांचा देखील आरोपपत्रात उल्लेख आहे.
सीबीआयने लालूप्रसाद यादव, राबडी देवी, त्यांची मुलगी मीसा भारती आणि अन्य १३ जणांची नावे आरोपी म्हणून दिली आहेत. सीबीआयने २३ सप्टेंबर २०२१ रोजी रेल्वेतील कथित घोटाळ्याबाबत प्राथमिक चौकशी नोंदवली होती. ती नंतर एफआयआरमध्ये रूपांतरित झाली. लालूप्रसाद यादव हे जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा २००४ ते २००९ दरम्यान ‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ हा घोटाळा झाला होता.
लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना रेल्वेत नोकऱ्या देण्याच्या बदल्यात अर्जदारांकडून जमीन घेण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. उमेदवारांना रेल्वे अधिकाऱ्यांनी अर्ज केल्यानंतर तीन दिवसांच्या आत गट ड पदांवर नियुक्त केले होते. नंतर जेव्हा या भरती केलेल्या व्यक्तींनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांची जमीन दिली तेव्हा त्यांना नियमित करण्यात आले, असा आरोप आहे.
CBI files a charge sheet against former Union railways minister & RJD chief Lalu Prasad Yadav, his wife Rabri Devi along with his daughter Misa Bharti & 13 others in “Land-for-job-scam” case: CBI sources
— ANI (@ANI) October 7, 2022
हे ही वाचा:
भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन
मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त
उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार
लालूप्रसाद यादव यांनी त्यांची पत्नी राबडीदेवी, मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव यांच्या नावावर संबंधित भूखंडांचे रजिस्ट्रेशन केले होते, असाही दावा सीबीआयने आरोपपत्रातून केला आहे.