राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने म्हणजेच सीबीआय चांगलाच दणका दिला आहे. अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २०२१ मधील अहवाल माध्यमांमध्ये लिक केल्या प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात पूजा हिच्यावर कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातील अहवाल तयार केला गेला. हा अहवाल पूजा हिने लीक केल्याचा आरोप आहे. त्या अहवालात अनिल देशमुख यांनी कोणताही गुन्हा केला नाही, असे म्हटले असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणात सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेत तिवारी आणि अनिल देशमुख यांचे वकील डगा यांना अटकही झाली होती.
पूजा हिने हा अहवाल मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील आनंद दिलीप डागासोबत कट रचला होता. त्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अहवाल देण्यासाठी लाच देण्याची योजना केली होती. २९ ऑगस्ट २०२१ रोजी हा अहवाल माध्यमांमधून लीक झाला होता.
हे ही वाचा:
ललित पाटील प्रकरणी पुणे पोलीस दलातील दोन पोलीस कॉन्स्टेबल्स बडतर्फ
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्री फडणवीसांचे नाहीत!
अबब!! १९२६ सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी मोजले २.७ मिलियन डॉलर्स
भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजाचे हौथी दहशतवाद्यांकडून अपहरण
अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख विरोधात सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. अहवाल मिळवण्यासाठी सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनी कथित लाच दिल्याचा ठपका या आरोपपत्रात केला आहे. या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निर्देशावर सीबीआय करत होती. पूजा, राहत यांच्यासोबत अनिल देशमुख यांचे नातेवाईक विक्रांत देशमुख आणि सयाजीत वायल यांनाही आरोपी करण्यात आले आहे. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी सीबीआयने त्यांची चौकशी केली होती. परंतु, त्यांना ताब्यात घेतले नव्हते.