24 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरराजकारणनाना पटोलेंना आडव्या गेलेल्या मांजरीला कार्यकर्ते आडवे गेले!

नाना पटोलेंना आडव्या गेलेल्या मांजरीला कार्यकर्ते आडवे गेले!

या अंधश्रद्धेविषयी काँग्रेसचे मत काय असा विचारला जातोय सवाल

Google News Follow

Related

विधानसभेची कसबा पेठ पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्याच्या मुद्यावरून बरीच चर्चा सुरु होती. कसाब पेठ आणि चिंचवड येथील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी भाजप आणि महा विकास आघाडीतील नेते पुण्यात दाखल झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील उमेदवारी संदर्भात चर्चा करण्यासाठी पुण्यातल्या काँग्रेस भवनात दाखल झाले. पण त्याच वेळी एक मांजरही तेथे अवतरली. मांजरीला पाहून नाना पटोलेंच्या पुढे चालणाऱ्या कार्यकर्त्याने मांजरीला आडवे जात रोखले. मांजर आडवी गेल्यास काम होत नाही, अशी एक अंधश्रद्धा आहे.

नाना पाटोलेही हा अशुभ संकेत मानतात का असा प्रश्न यावेळी सर्वाना पडला. ही मांजर आडवी जाऊ नये म्हणून नाना पटोले यांच्यासमोर असलेल्या कार्यकर्त्याची धावपळ झाली. त्या कार्यकर्त्याने मांजरीला हुसकावून लावले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी नाना पटोले पुण्यात ठाण मांडून आहेत. याच संदर्भात पटोले सकाळी काँग्रेस भवनात दाखल झाले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे त्यांच्या स्वागतासाठी गेटवर जाऊन थांबले. त्याच वेळी एक मांजर तेथे आली. ही मांजर नेमकी पाटोले यांच्या चालण्याच्या मार्गावर होती . ही मांजर त्यांना आडवी जाण्याची शक्यता होती. ही मांजर आडवी जाऊ नये म्हणून मग तिला पिटाळून लावण्याचा कार्यकर्त्यांचा खटाटोप सुरु झाला. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीच पुढाकार घेत मांजरीला हुसकावून लावण्यासाठी धडपड सुरु केली. अखेर या मांजरीला पटोले यांच्या मार्गातून हटवण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले. पण हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झाला.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याची चर्चा सुरु झाली. विज्ञानाच्या जगात आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जातो का अशी चर्चा आता रंगली आहे. राजकारणी देखील अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात का असा प्रश्न विचारला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा