राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीवाद वाढला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं लेखन वाचण्याचा सल्ला देण्यात आला. राष्ट्रवादीच्या या सल्ल्यानंतर आता राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण ९९ साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण ९९ नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.
आधी प्रत्येकाला स्वत:च्या जातीबद्दल अभिमान होता. पण अन्य जातींबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला, असं मी एकटाच बोललो. मला प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला देण्यात आला. मी सर्वांची पुस्तकं वाचलेत. प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असा जोरदार टोला राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावलाय.
हे ही वाचा:
मोदी सरकारची विद्युत वाहनांच्या दिशेने वेगाने वाटचाल
तालिबानकडे अमेरिकन शस्त्रास्त्र
अफगाणिस्तानवर कब्जा करूनही तालिबान कंगाल
तालिबानचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे
बाबासाहेब पुरंदरेंना मी इतिहास संशोधक म्हणून जातो, ब्राह्मण म्हणून नाही. पवारसाहेबांकडे मी मराठा म्हणून जात नाही. कुणाच्याही घरी आपण जात म्हणून जातो का? वॉर्डनिहाय आरक्षणापेक्षा स्त्री पुरुष हेच आरक्षण असलं पाहिजे. विरोध काय करणार, वरती जे ठरवात तेच करावं लागतं. अजून तुमचं नशीब तुमच्या क्षेत्रात मीडियात अजून आरक्षण नाही.
मी काय वाचतो आणि काय वाचलंय हे मला माहितीय, माझ्या पक्षाला माहितीय, मला मोजायचा प्रयत्न करु नये. बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास लिहिला म्हणता, पण सिद्ध करा ना.. ५० साली पहिलं पुस्तक आलं त्यावेळी तुम्हाला चुकीचा इतिहास कळला नाही का? ज्याचं काही आकलन नाही, त्याच्यावर काय बोलायचं? कोण जेम्स लेन? कुठे आहे सध्या? आग लावायला आला, त्याच वेळी का आला? हे सर्व वेल डिझाईन्ड आहे, असा गंभीर आरोपही राज यांनी यावेळी केलाय.