राज्य परीक्षा अधिकाऱ्याच्या घरात सापडले घबाड

राज्य परीक्षा अधिकाऱ्याच्या घरात सापडले घबाड

म्हाडा पेपर फुटी संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपास करत असताना टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला असून महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टीईटी परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी केलेल्या कारवाईबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. या प्रकरणात ४ कोटींपर्यंतचे गैरव्यवहार झाल्याचे सांगितले आहे.

पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांना अटक केली आहे. तुकाराम सुपे यांच्या घरातून ८८ लाख ४९ हजार ९८० रोख, पाच ग्राम सोन्याचे नाणे, ५ लाख ५० हजार रुपयांची एफडी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. याव्यतिरिक्त सुपे यांनी त्यांच्या मित्राला लाखो रुपये दिल्याचीही माहिती मिळाल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.

म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत २०२०च्या टीईटी परीक्षेच्या सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. या आधारे टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी सुरु करण्यात आली. त्यानंतर काल सुपे यांची चौकशी केल्यावर त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी अजून काही नावे समोर येतील असे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित निवडणुकांना २०२२ चा मुहूर्त!

महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

बेस्ट मुख्यमंत्र्यांचा घरातून चालवलेला ‘बेस्ट कारभार’

‘बलात्कार टाळू शकत नसाल तर त्याची मजा घ्या’ काँग्रेस आमदाराची मुक्ताफळे

ज्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यांना ओएमआर रिकामे ठेवण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या ओएमआरमध्ये बरोबर उत्तर नोंदवून त्या विद्यार्थ्यांचे निकाल बदलले जात होते, अशी माहिती गुप्ता यांनी दिली आहे.

प्रीतीश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत २०२०च्या टीईटी परीक्षेचे सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे २०२१च्या टीईटी परीक्षेत यातील बरेच विद्यार्थी पात्र असल्याचे यादीवरून लक्षात आले आहे. उमेदवारांकडून ३५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले जात होते.

Exit mobile version