पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता भाजपाचे नेते किंवा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती आणि बंगाल भाजपाचे प्रमुख दिलीप घोष यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमधील परिस्थिती भयावह- राज्यपाल जगदीप धनकर
पालिका आयुक्त चहल म्हणतायत महाराष्ट्रावर अन्याय नाही…
ठाकरे सरकार जाणुनबुजून लस उपलब्ध करुन देत नाहीये
सोनियांचे चरणचाटण उपयोगी पडलेले दिसत नाही- अतुल भातखळकर
दोन दिवसांपूर्वी तृणमूल कार्यकर्ता मृत्युंजय पॉल यांनी मिथुन तसेच दिलीप घोष यांनी बंगालमध्ये हिंसा पसरविण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना भडकावल्याची तक्रार केली होती. त्यानुसार या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आयपीसी १५३ (अ), ५०४, ५०५ या कलमांतर्गत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बंगालच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या. विशेषतः भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारण्याच्या किंवा त्यांची घरे, कार्यालये उद्ध्वस्त करण्याच्या घटनांत प्रचंड वाढ झाल्याचा दावा केला गेला. त्याबाबत भाजपचे वरिष्ठ नेतेही बंगालला जाऊन परिस्थितीची पाहणी करून आले. बंगालच्या राज्यपालांनीही राज्यातील या परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय, बंगालमधील परिस्थिती गंभीर असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे येत्या काळात असे गुन्हे अनेकांवर दाखल होतील. त्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांवर प्रामुख्याने गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बंगालला निवडणूकपूर्व किंवा निवडणुकोत्तर हिंसाचाराचा मोठा इतिहास आहे. याआधी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी यांच्यातही असे संघर्ष पाहाया मिळाले. नंतरच्या काळात तृणमूल आणि कम्युनिस्ट यांच्यात संघर्ष उफाळला. आता भाजपा आणि तृणमूल यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे.