30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरक्राईमनामाभारतविरोधी घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा

भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा

Google News Follow

Related

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमधील दोन वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृह वॉर्डन, व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांविरुद्ध दोन एफआयआर नोंदवले आहेत. या महाविद्यालयातून रविवारी पाकिस्तानने भारत विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर विद्यार्थ्यांनी भारतविरोधी घोषणा दिल्याचा धक्कादायक विडिओ समोर आला होता .

श्रीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) आणि शेर ए काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SKIMS) चे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. ज्यात काही विद्यार्थी भारतविरोधी आणि पाकिस्तानची स्तुती करणाऱ्या घोषणा देताना दिसत आहेत. गृहमंत्री अमित शहा जम्मू आणि काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला होता. अमित शाह कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर होते.

श्रीनगरमधील जम्मू काश्मीर पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शेर ए काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या हॉस्टेल वॉर्डन/विद्यार्थी इत्यादींविरुद्ध भारतविरोधी घोषणा दिल्याबद्दल आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा विजय साजरा केल्याबद्दल दोन एफआयआर नोंदवले आहेत. यूएपीए/आयपीसी कलमांतर्गत सौरा आणि करण नगर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवले गेले आहेत.” असं ट्विट पत्रकार आदित्य राज कौल यांनी केलं आहे.

“श्रीनगर शहरातील सौरा आणि करण नगर पोलिस स्टेशनमध्ये युएपीए आणि आयपीसीच्या ५०५ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. सध्या आमची चौकशी सुरू आहे. आम्ही या प्रकरणातून एक संदेश देऊ.” जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

हे ही वाचा:

समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?

‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे

पाकिस्तान जिंकल्याच्या जल्लोषात शिक्षिकेने गमावली नोकरी!

मुंबईकरांची लाईफ लाईन धावणार १०० टक्के क्षमतेने

जम्मू आणि काश्मीर पोलीस सध्या व्हिडिओंच्या माध्यमातून तपशीलवारपणे जात आहेत आणि रविवारी रात्री कॅम्पसमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी या महाविद्यालयांच्या कर्मचार्‍यांची चौकशी करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा