उत्तर प्रदेश मधील कव्वाली गायक नवाज शरीफ याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. देशविरोधी वक्तव्य करण्यासाठी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान का पता ना चले’ असे आक्षेपार्ह वक्तव्य त्याने मध्य प्रदेशात झालेल्या एका कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यावरुनच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
उत्तर प्रदेश मधील कवाली गायक नवाज शरीफ याचा मध्यप्रदेशात कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान त्याने प्रक्षोभक वक्तव्य केली आहेत. या वक्तव्यांचा व्हिडीओ विविध समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये तो पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातही आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यांना खुले आव्हान देताना दिसत आहे.
हे ही वाचा:
‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’
‘नवाज शरीफ यांनीच भारताला अजमल कसाबचा पत्ता दिला’
पाच तासांच्या तपासानंतर सतीश उकेंना ईडीने घेतलं ताब्यात
मेघालयचे म्हणताहेत असा मी ‘आसामी’
“मोदी जी कहते हैं हम हैं योगी जी कहते हैं कि हम हैं। अमित शाह कहते हैं कि हम हैं। यही दावा योगी आदित्यनाथ भी करते हैं, लेकिन ये लोग कौन हैं? ये कुछ भी नहीं कर सकते। गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान कहां था, कहां है और कहां पर बसा था, इसका पता भी नहीं चलेगा। वह जिधर नजर फेर दें, वहां वीरानगी छा जाती है।” असे धक्कादायक विधान त्याने केले आहे.
त्याच्या याच वक्तव्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आणि त्याच्या विरोधात टीकेची झोड उठली. भारत देशाच्या विरोधात आणि देशाच्या पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या विरोधात अशा प्रकारच्या आक्षेपार्ह विधाने करण्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. २८ तारखेला झालेल्या या कार्यक्रमातील प्रकारावरून स्थानिकांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.