महिला कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारल्याबद्दल इम्तियाझ जलील यांच्यावर गुन्हा दाखल

महिला कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारल्याबद्दल इम्तियाझ जलील यांच्यावर गुन्हा दाखल

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा अणल्याप्रकारणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दुकानांना सील ठोकल्यामुळे खासदार इम्तियाज जलील हे भडकले आणि त्यांनी काल (१ जून) कामगार कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. या वेळी कामगार उपायुक्त कार्यालयातील जमलेल्या जमावाचं कर्तव्य म्हणून चित्रीकरण करणार्‍या महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल खाली पाडण्यासाठी इम्तियाज जलील यांनी त्यांच्या हातावर फटका मारला. महिला कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर आज त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून शहरातील अनेक दुकाने सील करण्यात आली आहेत. या सील केलेल्या दुकानांना मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला आहे. छोट्या व्यापाऱ्यांनासुद्धा मोठा दंड आकारला गेला आहे. हा दंड व्यापाऱ्यांना भरणे शक्य नाही. दंड भरणे शक्य नसल्यामुळे या दुकानदारांना आपली दुकाने सुरु करता येत नाहीयेत. याच कारणामुळे इम्तियाज जलील कामगार कार्यालयात गेले होते.

यावेळी जलील यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्यावर व्यापाऱ्यांची दुकाने कमीत कमी दंडामध्ये सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी जलील यांनी कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे केली. त्या मागणीलासुद्धा उलटसुलट उत्तर मिळाली. याच कारणामुळे जलील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती.

हे ही वाचा:

जुगाड करून सरकार बनवलतं पण जनतेच्या मनातून देवेंद्रजीना नाही काढू शकलात

अब की बार, फिर से ३०० पार

रा.स्व.संघाची बदनामी केल्याप्रकरणी ‘मुंबई सागा’च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस

यांना समाज बांधवांची काळजी की पराभवाची भीती?

दरम्यान, राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत आहे. मात्र आता रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता निश्चित नियमानुसार औरंगाबादेत आजपासून दुकाने उघडण्यात आली आहेत. शहरात सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

Exit mobile version