गुजरात निवडणुकीचा प्रचार सुरू असताना त्याचे पडसाद भारतात तर उमटत आहेतच पण अगदी अमेरिकेपर्यंत ही रणधुमाळी पोहोचली आहे. अमेरिकेतील भारतीयांनी या निवडणुकीच्या निमित्ताने कार रॅलीचे आयोजन केले होते.
या कार रॅलीदरम्यान अधिकाधिक संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. अमेरिकेतील ह्यूस्टन टेक्सास येथे ३ डिसेंबरला या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समान अधिकार कार्यकर्ता जिया मंजिरी यांनी या रॅलीच्या आयोजनात पुढाकार घेतला. भारतीय जनता पार्टीच्या अनिवासी भारतीय असलेल्या समर्थकांचा यात मोठा सहभाग होता.
टीव्ही एशियाच्या पत्रकार मनीषा गांधी यांनी या रॅलीचे वार्तांकन केले. उमंग मेहता, बुध पटेल, महेंद्र, पुनित शहा आणि हरी अय्यर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात समन्वयकाची भूमिका बजावली. जिया मंजरी म्हणाल्या की, भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे केली असून भारताने विकासाच्या बाबतीत अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. गुजरातमधील निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही या रॅलीचे आयोजन केले आहे. भाजपा यावेळी विक्रमी मते मिळविल. सगळे विक्रम मोडले जातील. भारताच्या विकासात गेली दोन दशके गुजरातचे प्रमुख योगदान राहिलेले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी युवकांच्या रोजगाराला प्राधान्य दिले. क्रीडाधोरण, माहिती तंत्रज्ञान, फिल्म पर्यटन, स्टार्टअप अशा अनेक बाबींमध्ये आश्वासक पावले टाकली.
हे ही वाचा:
लंडनमध्ये त्यांना वडापाव पावला!
लोखंडी सळीमुळे रेल्वे प्रवाशाचा झाला मृत्यू
हिंदू महिलांबद्दल असभ्य टिप्पणी करणारा मौलवी अजमलने मागितली माफी
या रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच इतर नेत्यांचे फोटोही झळकत होते. नरेंद्र मोदी आणि भूपेंद्र पटेल यांचे डबल इंजिनचे सरकार गुजरातला नव्या शिखरावर नेईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या रॅलीला तेथील भारतीयांना प्रचंड प्रतिसाद दिला. स्मार्ट फायनान्शियल पार्किंग येथून सुरुवात झाली. पोलिसांनीही या रॅलीसाठी उत्तम सहकार्य केले. जिया मंजरी यांच्यासह नचिकेत जोशी यांचेही या रॅलीत महत्त्वाचे योगदान होते. ५ डिसेंबरला गुजरातमधील निवडणुकीचा दुसरा टप्पा होतो आहे. ८ डिसेंबरला निवडणूक निकाल लागणार आहेत.