आगामी वर्षात पंजाबच्या विधानसभा निवडणूका फारच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. पंजाबच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कप्तान अमरिंदर सिंग यांनी आपला स्वतंत्र नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. मंगळवार, १९ ऑक्टोबर रोजी अमरिंदर सिंग यांनी या संदर्भातील घोषणा केली.
गेल्या काही काळापासून पंजाबमध्ये काँग्रेस पक्षात बराच मोठ्या प्रमाणात कलह पाहायला मिळाला. काँग्रेसचा चेहरा असलेले मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना हटवण्यात आले. या मागे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष झालेले नवज्योत सिंग सिद्धू यांच्या सोबत झालेले वाद कारणीभूत होते. अमरिंदर सिंग यांना हटवून चरणजीत सिंग चन्नी यांना पंजाबच्या मुख्यमंत्री पदी विराजमान केले गेले. या सर्व घडामोडींमुळे कॅप्टन अमरिंदर सिंग नाराज असल्याचे समोर आले होते. त्यातच आता अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष काढायची घोषणा केल्यामुळे या राजकीय नाट्याचा आता पुढचा अंक सुरु होताना दिसत आहे.
हे ही वाचा:
जयंत पाटलांच्या शिक्षण संस्थेने सरकारचीच जमीन सरकारला देऊन तीसपट मोबदला मिळवला!
काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा
‘आर्यन खानची पाठराखण करणे ही लाजिरवाणी बाब’
उल्हासनगरमध्ये लोक छत्री घेऊन जात आहेत शौचालयात… वाचा काय आहे कारण?
भाजपा सोबत युती करणार?
अमरिंदर सिंग यांनी नवा पक्ष काढण्याची घोषणा केल्यामुळे पंजाबमध्ये नव्या युतीची नांदी होणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. त्यामुळेच आता कॅप्टन यांचा नवा पक्ष भाजपासोबत युतीकरणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. पण या संभाव्य युतीचे भवितव्य हे शेतकरी कायद्यांवर अवलंबून असल्याचे म्हटले जात आहे.