अमरिंदर म्हणतात, शेतकरी आंदोलन पंजाबात नको, तिकडे दिल्लीत करा!

अमरिंदर म्हणतात, शेतकरी आंदोलन पंजाबात नको, तिकडे दिल्लीत करा!

गेल्या वर्षी सुरू झालेले शेतकरी आंदोलन आपल्या राज्यात नको. जे काही करायचे ते दिल्लीत करा, असे वक्तव्य पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केले आहे. त्यामुळे या आंदोलनाविषयीची त्यांची वास्तव भूमिका समोर आल्याचे म्हटले जात आहे.

अमरिंदर सिंग यांनी या आंदोलनाचे पंजाबच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असल्याचे म्हटले असून ज्यांना या आंदोलनात भाग घ्यायचा आहे त्यांनी दिल्लीत जाऊन ते करावे. पंजाबला आणि पंजाबमधील प्रशासनाला त्यापासून दूर ठेवावे, असे म्हटले आहे.

अमरिंदर सिंग यांच्या या वक्तव्यावर आता टीका होऊ लागली आहे.

ते म्हणाले की, जर तुम्हाला केंद्र सरकारवर या आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणायचा आहे तर तुम्ही दिल्लीत जा. तुमच्या आंदोलनाने पंजाबला त्रास देऊ नका. अमरिंदर म्हणाले की, आजही शेतकरी पंजाबात ११३ ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्यामुळे पंजाबच्या अर्थव्यवस्थेला फटका बसतो आहे.

हे ही वाचा:

कौतुकास्पद! भारतीय दिव्यांग पोहोचले सियाचीन शिखरावर!

शिया मुसलमानांवर अन्याय होत असल्याने इराण तालिबानवर नाराज?

लवकरच कंगना दिसणार सीता मैय्याच्या भूमिकेत

कांदिवलीतली १६ वर्षीय मुलगी हैदराबादेत कशी सापडली?

होशियारपूर येथील मुखलियाना गावातील शासकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभात अमरिंदर बोलत होते.

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना पंजाबबाहेर आंदोलन करण्याचा दिला सल्ला दिला आहे. किसान आंदोलन हे काँग्रेस पुरस्कृत देशव्यापी अराजक माजविण्याचे षड्यंत्र आहे, त्याचा हा पुरावा. पंजाबात सत्ता असल्यामुळे तिथे आंदोलन नको बाकी देशात आग लागली तरी चालेल असा हा कुटील डाव.

Exit mobile version