अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांनी फडकवला विजयाचा झेंडा

अमेरिकी काँग्रेसच्या सभागृहातील भारतीय वंशाच्या उमेदवारांची संख्या पाच वरून सहा

अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांनी फडकवला विजयाचा झेंडा

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. दरम्यान, या निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांनीही विजयाचा झेंडा फडकावला आहे. अमेरिकेतील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या निवडणुकीत सहा भारतीय अमेरिकन लोकांनी विजय मिळवला आहे. यामुळे सध्याच्या अमेरिकी काँग्रेसच्या सभागृहातील त्यांची संख्या पाच वरून वाढून सहा झाली आहे.

व्हर्जिनियामध्ये, भारतीय- अमेरिकन वकील सुहास सुब्रमण्यम हे समुदायातील राज्यातून आणि संपूर्ण पूर्व किनाऱ्यातून निवडून येणारे पहिले उमेदवार ठरले आहेत. सुब्रमण्यम हे सध्या व्हर्जिनिया राज्याचे सिनेटर आहेत. सुब्रमण्यन यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माईक क्लॅन्सी यांचा पराभव केला.

“मला आदर वाटतो की, व्हर्जिनियाच्या १० व्या जिल्ह्यातील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि निकाल दिला. हा जिल्हा माझे घर आहे. येथे माझे लग्न झाले आहे, माझी पत्नी मिरांडा आणि मी आमच्या मुलींचे संगोपन करत आहोत. येथील समुदायाच्या समस्या आमच्या कुटुंबासाठी वैयक्तिक आहेत, वॉशिंग्टनमध्ये या जिल्ह्याची सेवा करणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे,” असे सुब्रमण्यम यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.

हे ही वाचा : 

महाविकास आघाडी नव्हे ही महाअनाडी आघाडी, त्यांना देश, धर्माची चिंता नाही!

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला

सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या मुस्लीम व्यापाऱ्याविरोधात संताप व्यक्त करणाऱ्या हिंदुंवर पोलिसांचा हल्ला

सुब्रमण्यम यांनी याआधी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात व्हाईट हाऊसचे सल्लागार म्हणून काम केले होते. ते अमेरिकेतील भारतीय-अमेरिकन समुदायात लोकप्रिय आहेत. अमी बेरा, राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, प्रमिला जयपाल आणि श्री ठाणेदार या पाच भारतीय अमेरिककन यांच्या ‘समोसा कॉकस’ गटात ते सामील झाले आहेत. अमेरिकेतील मूळ भारतीय वंशाच्या प्रतिनिधींच्या गटाला ‘सामोसा कॉकस’ (Samosa Caucus) असे म्हटले जाते. सर्व पाच विद्यमान भारतीय- अमेरिकन सदस्यदेखील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये पुन्हा निवडून आले आहेत.

Exit mobile version