राष्ट्रपती पदासाठी १८ जुलैला निवडणूक होणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवारांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मंगळवार,२१ जून रोजी विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी तृणमुल काँग्रेसचे यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ही माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली आहे. यशवंत सिंह २७ जूनला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
We (opposition parties) have unanimously decided that Yashwant Sinha will be the common candidate of the Opposition for the Presidential elections: Congress leader Jairam Ramesh pic.twitter.com/lhnfE7Vj8d
— ANI (@ANI) June 21, 2022
आज विरोधी पक्षाची बैठक पार पडली. पक्षांतील नेत्यांच्या चर्चेनंतर यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे. यशवंत यांच्या नावाला १९ पक्षांनी समर्थन दिले आहे. विरोधी पक्षाच्या बैठकीला जयराम रमेश, सुधींद्र कुलकर्णी, दीपंकर भट्टाचार्य, शरद पवार, डी राजा, तिरुची शिवा , प्रफुल्ल पटेल, येचुरी, एनके प्रेमचंद्रन, मनोज झा, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला, हसनैन मसूदी, अभिषेक बॅनर्जी आणि राम गोपाल यादव या बैठकीला उपस्थित होते. याशिवाय या बैठकीला ओवैसी पक्षाचे खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते.
हे ही वाचा:
“एकनाथ शिंदेंचा विषय शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा”
‘बाळासाहेब,आनंद दिघेंचा वारसा एकनाथ शिंदे चालवणार’
‘वाझेला सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री- देशमुखांचा दबाव’
१३ आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; ठाकरे सरकार अडचणीत
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी यशवंत सिन्हा यांनी सकाळी ट्वीट करत ‘तृणमूल काँग्रेसमध्ये मला सन्मान आणि प्रतिष्ठा दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आहेत.