कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांनी हिंदू मंदिरावर आणि भक्तांवर हल्ला केल्यानंतर त्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यातच जिथे हिंदू मंदिरावर हल्ला झाला तिथे एक पोलिसच खलिस्तानी मोर्चात सामील झाल्याचे समोर आले. त्याला निलंबित करण्यात आले आहे. हरिंदर सोही असे त्याचे नाव आहे.
ब्राम्प्टन येथे हिंदू मंदिरावर रविवारी हल्ला झाला, त्यात खलिस्तान समर्थकांनी भक्तांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. त्यावर टीका झाली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी याचा निषेध केला पण त्यांच्या या निषेधाला अर्थ नाही अशा प्रतिक्रिया उमटल्या. आता थेट पोलिसच खलिस्तान समर्थक असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा:
ग्रँटरोडच्या हॉटेलच्या खोलीत सापडला सुरतच्या व्यापाऱ्याचा मृतदेह,मृतदेहासोबत होती मुलगी
जेएमएम-काँग्रेसची युती म्हणजे, ‘घुसखोरांची आघाडी’,’माफियांचा गुलाम’
‘राज ठाकरेंनी भेट नाकारली, आता निवडणूक लढवणार’
सोही हा पील रिजनल पोलीस विभागात काम करतो. त्या मोर्चात खलिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी होत होती, तसेच भारतविरोधी घोषणाही दिल्या जात होत्या. त्यात खलिस्तानचा झेंडा घेऊन सोही सहभागी झाल्याचे दिसत होते.
ब्राम्प्टन येथे हिंदू सभा मंदिरात जमलेल्या भक्तांवर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला होता तसेच हातातील झेंड्यांच्या काठ्यांनी त्यांना मारहाण केली होती.
यासंदर्भात आता चौकशी केली जाणार असून तूर्तास त्याला निलंबित केले गेले आहे.
कॅनडामधील या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली होती आणि कॅनडाच्या सरकारने हिंदू मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली होती.
यावेळी कॅनडातील खासदार चंद्र आर्य यांनी खलिस्तानी समर्थकांवर टीका करताना त्यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत असे म्हटले. जस्टीन ट्रुडो या घटनेचा निषेध करत असले तरी ते कठोर कारवाई करत नाहीत असे मतही त्यांनी व्यक्त केले होते.