भारताच्या इशाऱ्यानंतर अखेर कॅनडाचे ४१ राजनैतिक अधिकारी गेले घरी

अधिकाऱ्यांची संख्या कमी करण्याची सूचना कॅनडाला केली होती.

भारताच्या इशाऱ्यानंतर अखेर कॅनडाचे ४१ राजनैतिक अधिकारी गेले घरी

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारतातील सुरक्षा दलाचा हात असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केल्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने देशातील कॅनडाच्या उच्चायुक्त कार्यालयात काम करणाऱ्या ४१ अधिकाऱ्यांना परत बोलवावे, अशा सूचना दिल्या होत्या. अखेर हे ४१ अधिकारी मायदेशी परतले आहेत.

 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीपसिंगच्या हत्येशी भारताचा संबंध जोडून एकच खळबळ उडवून दिली होती. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये ताण वाढला असताना केंद्र सरकारने गेल्या महिन्यात भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्त कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या कमी करण्याची सूचना कॅनडाला केली होती.

 

त्यानुसार, ४१ अधिकाऱ्यांना मायदेशी बोलावण्यात आल्याचे कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जॉली यांनी स्पष्ट केले. तसेच, कॅनडा अशाप्रकारे प्रत्युत्तर देणार नाही, अशी पुस्तीही जोडली. ‘या अधिकाऱ्यांना शुक्रवारपर्यंत मायदेशी न बोलावल्यास भारताने या अधिकाऱ्यांचा परदेशांतील उच्चायुक्तांचा अधिकृत दर्जा रद्द करण्याची धमकी दिली होती. हे पाऊल अवाजवी आणि राजनैतिक संबंधांवरील व्हिएन्ना कराराचे स्पष्टपणे उल्लंघन करणारे आहे. मात्र भारताच्या या पावलामुळे आमच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी आम्ही त्यांना भारतातून सुरक्षितपणे बाहेर काढले आहे,’ असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

हे ही वाचा:

विषप्रयोग करून २० दिवसांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

बारामतीत विमान कोसळलं, पायलट जखमी!

शरद पवार देशहिताचे, समाजहिताचे केव्हा बोलणार?

चहाबिस्किटे देत आजीबाईंचा दहशतवाद्यांशी ‘लढा’

‘जर आपण राजनैतिक तत्त्वांच्या आदर्शाचे पालन केले नाही तर हे अधिकारी कुठेही सुरक्षित राहणार नाहीत. त्यामुळे आम्ही भारताला तसे प्रत्युत्तर देणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. या ४१ अधिकाऱ्यांसोबत त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे४२ कुटुंबीयही भारतात राहात होते.

Exit mobile version