कॅनडाचे राष्ट्रपती जस्टीन ट्रूडो आणि त्यांचे कुटुंबीय अज्ञातवासात गेले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या साऱ्याला कारणीभूत ठरले आहे कॅनडामध्ये सुरू असलेले सरकार विरोधी आंदोलन.
कॅनडामध्ये सध्या सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहिले आहे. कॅनडामध्ये कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर लावलेले निर्बंध उठवावेत या मागणीसाठी हे आंदोलन उभे राहिलेले दिसत आहे. कॅनडाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक पार्लमेंट हिल परिसरात एकत्र जमताना दिसत आहेत आणि सरकार विरोधात तीव्र वातावरण निर्माण झालेले दिसत आहे.
हे ही वाचा:
मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाने गमावला पाय
‘संजय राऊत यांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक’
भारतातील ७५% प्रौढ नागरिक लसवंत
यापैकी बहुतांश आंदोलक हे ट्रक ड्रायव्हर आहेत. शनिवारपासून या सर्व आंदोलकांनी पार्लमेंट हिल परिसरात एकत्र यायला सुरूवात केली. तेव्हापासूनच हे आंदोलन चिघळू नये आणि शांततामय मार्गाने आंदोलन व्हावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. या आंदोलकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू असलेली पहायला मिळत आहे. ‘फ्रिडम ओव्हर फिअर’ अशा स्वरूपाचे पोस्टर्स झळकवताना दिसत आहेत. हे ट्रक ड्रायव्हर्स संपूर्ण शहरभर मोठमोठ्याने हाॅर्न वाजवत फिरत होते.
पण असे असले तरि देखील सुरक्षेच्या कारणास्तव कॅनडाचे राष्ट्रपती ट्रूडो आणि त्यांच्या परिवाराला अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. कॅनडाच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान या आंदोलनाच्या ठिकाणाहून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी राष्ट्रपती ट्रूडो यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.