खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येप्रकरणी कॅनडातून भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी

भारत कॅनडा संबंध चिघळणार

खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येप्रकरणी कॅनडातून भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या १८ जून रोजी झालेल्या हत्येप्रकरणी कॅनडाने भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी ही घोषणा केली.

 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी जूनमध्ये झालेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारचा संभाव्य संबंध असल्याचा दावा केल्यानंतर कॅनडाने सोमवारी एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली.

 

कॅनडाची सुरक्षा यंत्रणा भारत सरकार आणि खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येचा संबंध तपासत आहेत.
भारतीय गुप्तचर विभागाच्या प्रमुखाची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी जाहीर केले. ‘या अधिकाऱ्याचा पर्यायाने भारताचा या हत्येमागे संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास हे सार्वभौमत्वाचे आणि देशांनी एकमेकांशी कसे वागले पाहिजे, या मूलभूत नियमांचे उल्लंघन होईल. त्यामुळे आम्ही एका उच्च भारतीय अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे,’ असे त्या म्हणाल्या.

 

जस्टिन ट्रूडो यांनी हे प्रकरण अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे मांडले होते, असेही त्या म्हणाल्या. ओटावा येथील ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये बोलताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या प्रकरणाचा कॅनडातील सुरक्षा यंत्रणा कसून तपास करत असून भारत सरकारचे एजंट आणि कॅनेडियन नागरिक हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येतील संभाव्य संबंधाचा तपास सुरू असल्याचेही नमूद केले होते.

 

 

ट्रूडो यांनी जी २० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरही हा मुद्दा उपस्थित केला होता. ‘भारतातील उच्च गुप्तचर अधिकाऱ्यांबाबत जी २० परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्याकडे मी व्यक्तिश: चिंता व्यक्त केली होती,’ असेही त्यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणाच्या तपासासाठी भारत सरकार कॅनडाला सहकार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मला माहीत आहे की, भारतीय-कॅनेडियन समुदायातील काही सदस्य संतप्त किंवा घाबरलेले आहेत, मात्र त्यांनी शांत राहावे, असे आवाहन ट्रुडो यांनी केले.

 

भारत सरकारला हवा असलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर या वर्षी १८ जून रोजी गोळीबारात मारला गेला. निज्जरची सरे येथील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सन २०२२मध्ये, पंजाबमधील जालंधरमध्ये एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) निज्जरवर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पुजाऱ्याच्या हत्येचा कट खलिस्तान टायगर फोर्सने (केटीएफ) रचला होता. कॅनडात स्थायिक असलेला निज्जर हा केडीएफचा प्रमुख होता.

हे ही वाचा:

महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

गणेश चतुर्थीच्या तोंडावर मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी

खर्गेचे G2 आणि गोयल म्हणाले 2G, One G, son G !

महाराष्ट्रात ‘शांतता’ आणि ‘सलोखा’ हाच त्या बैठकीचा अजेंडा…

 

१० सप्टेंबर रोजी दिल्लीत झालेल्या जी २० शिखर परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीत खलिस्तानी अतिरेकी आणि ‘परकीय हस्तक्षेप’ यावर चर्चा केली होती. त्यावेळी मोदींनीही कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याकडे कॅनडातील दहशतवादी घटकांद्वारे सुरू असलेल्या ‘भारतविरोधी कारवायां’बद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती.

 

 

‘खलिस्तान दहशतवाद्याच्या हत्येमागे भारत’

१८ जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा सहभाग असू असतो, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओ यांनी केला आहे. तसेच, कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणा या दोहोंचा संबंध तपासत आहेत, असेही त्यांनी जाहीर केले. ‘भारत सरकारचे एजंट्स आणि कॅनडातील नागरिक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या संबंधाचा कॅनडातील सुरक्षा यंत्रणा कसून तपास करत आहेत,’ असे ट्रुडेऊ यांनी ओट्टावा येथील ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये जाहीर केले.

 

Exit mobile version