“राज्यातील संपूर्ण कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. केंद्रीय मंत्र्यावर एखादी केस नाशिकमध्ये दाखल करायची, गुन्हा घडलाय महाडमध्ये, स्थानबद्ध रत्नागिरीत करायचं असं सुरू आहे. केंद्रीय मंत्र्याला अटक करतात, दुसरीकडे माजी गृहमंत्र्याला लुक आऊटची नोटीस आहे, माजी गृहमंत्री मात्र सापडत नाही. खरंतर अनिल देशमुख यांनी स्वतः ईडीच्या चौकशीला सामोरं गेलं पाहिजे. त्यांना ५-५ ईडीच्या नोटीस गेलेल्या आहेत, तरीही ते हजर होत नाहीत. अशाप्रकारचं विश्वास नसलेलं, गैर विश्वासानं स्थापन झालेलं सरकार महाराष्ट्रात सुरू आहे. परंतू त्यांना ईडीला सामोरं जावं लागेल.” असं भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे म्हणाले.
राम शिंदे यांनी ईडी चौकशीवरुन राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टोलेबाजी केलीय. वकील, पोलीस अधिकाऱ्याला अटक होते आणि आरोपी फरार आहे, हे पहिल्यांदा घडतंय, असं म्हणत राम शिंदे यांनी अनिल देशमुख यांना टोला लगावला. तसेच देशमुखांनी स्वतःहून ईडी चौकशीसाठी हजर राहावं, असं मत व्यक्त केलं.
“पहिल्यांदाच बघतोय की वकिलाला आणि पोलीस अधिकाऱ्यालाच अटक झालीय आणि आरोपी फरार आहे. दुसरीकडे हे केंद्रीय मंत्र्याला अटक करत आहेत. अशा परिस्थितीत अनिल देशमुख यांनी स्वतः हजर झालं पाहिजे. नसेल तर पोलिसांनी ते कुठं आहे हे माहिती आहे. ते कोरोना लॉकडाऊनच्या काळात ते पोलिसांना तेल लावून काठ्या ठेवा म्हणाले होते. त्यांना कदाचित त्याच काठीची भीती वाटते की काय माहिती नाही,” असंही राम शिंदे यांनी नमूद केलं.
हे ही वाचा:
आता ‘या’ क्षेत्रातही होणार खाजगीकरण
५० कोटींचा दावा खुशाल टाकावा, मी घाबरत नाही
मोदी एक्स्प्रेसमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा गजर
मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने विकृत निर्ढावलेले
राम शिंदे म्हणाले, “भारतात सर्वांना स्वातंत्र्य आहे. स्वतःचे मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, अस असताना परळीत जे घडलं आणि सोशल मीडियावर जे पाहायला मिळालं ते चुकीचं आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे सत्य आहे ते समोर यायला हवं. शेवटी कुणाला अडवून, कुणाला दडवून काम होणार नाही. परंतु राज्यातील एखाद्या मंत्र्यानं अशा अन्याय आणि अत्याचाराची भूमिका घेतली तर त्याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.”