राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी पीएमश्री हि योजना लागू केली होती आता, हीच योजना शिंदे फडणवीस सरकारने आपल्या राज्यात करून पहिल्या टप्प्यात ८१६ शाळाचा विकास होणार आहे. तर राज्यातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टरी १५००० पंधरा हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आहे. राज्यातील ८१६ शाळांचा विकास पहिल्या टप्प्यातील शाळांच्या सक्षमीकरणासाठी पीएमश्री योजनेतून करणार आहेत. याशिवाय जेजुरी, सेवाग्राम आणि छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याच्या उचित निर्णय घेण्यामध्ये शासनाला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिनंदनच ठराव राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार मांडण्यात आला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
महाराष्ट्र राज्यात पीएमश्री योजना राबवून पहिल्या टप्प्यात ८१६ शाळांचे सक्षमीकरण करणार. धान्य शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५,००० रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार पाच लाख शेतकऱ्यांना लाभ एक हजार कोटीच्या निधीची मान्यता , डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा करण्याचा अध्यादेश काढणार
पुणे जिल्याह्यातील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ एकूण ३९७ कोटी ५४ लाख खर्चाचा विकास आराखडा , जेजुरी तीर्थ क्षेत्र साठी १२७ कोटी २७ लाखांचा आणि सेवाग्राम विकास आराखडा १६२ कोटींचा चे आराखड्याचे सादरीकरण झाले. पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार यासाठी ७८७ कोटी खर्चास मान्यता शिवाय ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार.
हे ही वाचा:
बालविवाहाविरोधात हिमंता बिस्व सर्मा का आहेत आक्रमक?
सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात उद्धव ठाकरे-शिंदे गटातील संघर्षावर सुनावणी
पुलावामा हल्ल्यातील जवानांना देशभरातून श्रद्धांजली
पहाटेच्या शपथविधीवरचा पडदा अखेर फडणवीसांनी उघडला; शरद पवार वैतागले
काय आहे पीएमश्री योजना
या योजनेतून शाळांना सक्षम केले जाणार आहे. खेळांच्या माध्यमातून अभ्यास आणि संशोधन यांचा मेळ साधून त्यावर भर दिला जाणार आहे. शाळांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांवर भर देऊन डिजिटल वाचनालय, खेळ विभाग, आणि काळ शिक्षण यांचा समावेश असणार आहे. शेतीशी निगडित बाबी शिक वाल्या जाऊन पाणी आणि वीज यांच्यावर सखोल अभ्यास केला जाईल.