मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता दिल्लीवरून माघारी आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

शिवसेना- भाजपा असं युतीचे हे सरकार असल्यामुळे कोणत्या आमदारांची मंत्रिपदासाठी वर्णी लागणार याकडे लक्ष लागून आहे. शिवसेनेतील अनेक मंत्री हे आपली पदं सोडून एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आले आहेत. त्यामुळे त्यांनाही मंत्रीपदाची अपेक्षा आहे तर दुसरीकडे भाजपातही मंत्रिपदासाठी दावेदार असणाऱ्या आमदारांची संख्या मोठी आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुवर्णमध्य कसा काढणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत खाते वाटपावर सविस्तर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता दिल्ली वारीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

डॅशिंग IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा सन्मान

द्रौपदी मुर्मू यांना सपा, बसपासह जनसत्ता दलाचा जाहीर पाठिंबा

एलन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सचा ट्विटर खरेदी करार केला रद्द!

गीता गोपीनाथ ‘आयएमएफ’च्या भिंतीवर झळकलेल्या पहिल्या महिला अर्थशास्त्रज्ञ

तर ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे ही सुनावणी पार पडल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version