29 C
Mumbai
Friday, October 4, 2024
घरराजकारणऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय

Google News Follow

Related

राज्य मंत्रिमंडळाची बैठक शुक्रवार, ४ ऑक्टोबर रोजी पार पडली. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असून आचारसंहिताही लागू शकते. अशातच होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाखाच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तर, जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यासह अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

हे ही वाचा : 

पवन कल्याण म्हणतात, सनातन धर्म प्रमाणपत्र हवे!

लाडू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या देखरेखीखाली करणार एसआयटी

पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार, राजेखां करीम पठाणसह तिघांना अटक!

नसरल्लानंतर हिजबुल्लाचा संभाव्य नवा प्रमुख हाशिम सफिद्दीनला टिपले

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. तसेच राज्य मंत्रिमंडळाने ३ ऑक्टोबर हा दिवस यापुढे ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील ठराव मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवला.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

  • राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ
  • महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार
  • दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन
  • त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देणार
  • टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व अनिल भाऊ बाबर यांचे नाव
  • पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार; सिल्लोड मधील जमिनीला सिंचन
  • प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद
  • राज्यातील खेळाडूंसाठीच्या पारितोषिकांचा रकमेत वाढ
  • राज्यातील आणखी १०४ आयटीआय संस्थांचे नामकरण
  • संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार
  • लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण
  • कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या
  • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना
  • राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र
  • जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ
  • महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ
  • आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार
  • बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल
  • कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय
  • महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार
  • कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव
  • बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे
  • गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार; २६०४ कोटीस मान्यता
  • राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार. १ लाख ६० हजार कोटींचे गुंतवणूक अपेक्षित
  • उच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा; अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन
  • राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण
  • शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार
  • बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना
  • सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार
  • वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार
  • डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना
  • वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी
  • रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढ
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा