पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार १९ जानेवारी रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाच्या बाबतीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा (एनसीएसके) कार्यकाळ आणखी तीन वर्षांसाठी वाढवायला मंजुरी दिली आहे. ३१ मार्च २०२२ रोजी हा कार्यकाळ संपत होता. पण आता त्याला मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
या तीन वर्षांच्या मुदतवाढीच्या निर्णयामुळे सुमारे ४३.६८ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. या आयोगाला मुदतवाढ मिळाल्यामुळे देशातील सफाई कर्मचारी आणि मैला उचलणारे सफाई कर्मचारी (मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स) हे या निर्णयाचे प्रमुख लाभार्थी असतील.
हे ही वाचा:
लंडनच्या आलिशान घरातून विजय मल्ल्याला काढणार बाहेर
अपहरण झालेला ‘डुग्गू’ अखेर सापडला
गोव्यात काँग्रेसला महाविकास आघाडी झेपली नाही!
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची स्थापना १९९३ मध्ये करण्यात आली. एनसीएसके कायदा १९९३ च्या तरतुदींनुसार सुरुवातीला मार्च १९९७ पर्यंतच्या कालावधीसाठी करण्यात आली. नंतर कायद्याची वैधता आधी मार्च २००२ पर्यंत आणि त्यानंतर फेब्रुवारी २००४ पर्यंत वाढवण्यात आली. पण एनसीएसके कायदा फेब्रुवारी २००४ पासून लागू होणे बंद झाले. त्यानंतर ठरावांद्वारे वेळोवेळी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ बिगर -वैधानिक संस्था म्हणून वाढवण्यात आला आहे. सध्याच्या आयोगाचा कार्यकाळ ३१ मार्च २०२२ पर्यंत होता.