‘भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह’ आता काँग्रेसचे घोषवाक्य असेल

‘भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह’ आता काँग्रेसचे घोषवाक्य असेल

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील छात्र संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याने काल २८ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आज वर या कथित युवा नेत्यांला काँग्रेसची बी टीम म्हटले गेले होते. पण आता त्याने अधिकृतपणे काँग्रेसचा ‘हात’ धरला आहे. त्याच्या या पक्ष प्रवेशावरून भारतीय जनता पार्टीने मात्र बोचरी टीका केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी.रवी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागले आहे.

जेएनयूच्या विद्यार्थी संघाचा अध्यक्ष राहिलेला कन्हैया कुमार हा काही वर्षांपूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. देशविरोधी विचारांना जेएनयुमध्ये खतपाणी घातले जात असल्याची चर्चा कायमच रंगताना दिसते. काही वर्षांपूर्वी याच जेएनयू मधून ‘भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. तर त्यासोबतच ‘भारत के बरबादी तक जंग रहेगी, जंग रहेगी’ अशा घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ समोर आले होते. यावेळेस कन्हैया कुमार चर्चेत आला आणि प्रसिद्ध झाला. तेव्हापासून कन्हैयाला युवा नेता म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला पण त्याला फार काही यश मिळताना दिसले नाही. २०१९ साली कम्युनिस्ट पक्षाकडून कन्हैयाने लोकसभा निवडणूक लढवली पण तो पराभूत झाला.

हे ही वाचा:

…अखेर ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड इतिहासजमा

मुंबई पुन्हा विजयी ट्रॅकवर

नवजोत सिंह सिद्धू यांची ‘हिट विकेट’

शिक्षण विभागातील १० पैकी ९ अधिकारी मुस्लिम

कन्हैयाने आता आपल्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवार, २८ सप्टेंबर रोजी कन्हैयाने राहुल गांधी यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावरूनच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी.रवी यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना काँग्रेस ने आता ‘भारत तेरे तुकडे होंगे हे आपले घोषवाक्य करावे’ असे म्हणत चपराक मारली आहे.

Exit mobile version