काँग्रेसच्या कार्यकाळात जातींचे वर्चस्व होते. त्या वेळी केवळ कर्पुरी ठाकूर यांचा उदय नाही झाला तर त्यांनी प्रत्येक वर्गावर स्वतःची छाप सोडली. त्यामुळे त्यांना जननायक मानले जात होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जन्मशताब्दीच्या एक दिवस आधी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा केल्याने याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
नीतीश कुमार यांच्या बोलण्याचा अर्थ समजून घ्या
माजी मुख्यमंत्री आणि महान समाजवादी नेते जननायक कर्पुरी ठाकूर यांना केंद्र सरकारने सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याने मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा निर्णय त्यांनी योग्य असल्याचे म्हटले आहे. ‘स्वर्गीय कर्पुरी ठाकूर यांना त्यांच्या १००व्या जयंतीनिमित्त दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान दलित, वंचित आणि उपेक्षितांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करेल. मी नेहमीच स्व. कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी करत आलो आहे. आज जननायकाला हा सन्मान दिला जात असल्याने मी खूप आनंदित झालो आहे,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी दिली आहे.
जदयूला दिली भेट
जदयूमध्ये गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांना हटवण्याचा मुद्दा समोर आला. तेव्हा एक नाव चर्चेत आले. ते होते रामनाथ ठाकूर. जदयूचे नेते आणि राज्यसभेचे खासदार रामनाथ ठाकूर हे कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र आहेत. मात्र रामनाथ नव्हे तर नीतीश कुमार जदयूचे अध्यक्ष झाले. त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस बनवले गेले. त्यात कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केल्याने रामनाथ ठाकूरसह संपूर्ण जदयू आनंदात आहे. त्यामुळे जदयू आणि भाजपमधील संबंध निवळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
संरक्षण प्रकल्पांमध्ये खर्चवाढ अन् विलंब नको!
इम्रान खान यांना सात प्रकरणांमध्ये जामीन पण; निवडणूक लढवण्याचा मार्ग बंदचं
मृतदेह लपवण्यासाठी लावली आग; ७६ जणांचा होरपळून मृत्यू!
हवाच काढून घेतली
पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा करून एकावेळी बिहारच्या दोन्ही सत्तारूढ पक्षांकडून पाटण्यात होणाऱ्या कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमातील मोठ्या मुद्द्याची हवाच काढून घेतली आहे. लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि नीतीश कुमार यांच्या जनता दलाने कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली असती. मात्र आता ते ती मागणी करू शकणार नाहीत. उलट त्यांना आता केंद्र सरकारचे आभार मानावे लागतील. तसेच, भाजपही मागास जातींप्रति पक्षाच्या मनात आदर आहे, याचे प्रमाण देईल. त्यामुळे मागास जातीचा भाजपराजमध्ये सन्मान होत नाही, या राजद आणि जनता दलच्या आरोपांची हवाच मोदींनी काढून घेतली आहे.