वसईत ठाकरे ठाकूर युती?

वसईत ठाकरे ठाकूर युती?

वसई विरार महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीसोबत युती करण्यासाठी महाविकास आघाडी इच्छुक असल्याचं समोर येत आहे. युती झाली तरी सत्ताधारी बविआ, महाविकास आघाडीला किती जागा देणार? हा प्रश्न आहे.

गेल्या महापालिका निवडणुकांसह लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपानी बहुजन विकास आघाडीविरोधात मोठी ताकद लावली होती. परंतु तरीही एकहाती सत्ता मिळविण्यात हितेंद्र ठाकूर यांचा बविआ पक्ष यशस्वी झाला. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळणार, याची उत्सुकता आहे.

हे ही वाचा:

वसई-विरार महानगरपालिकेत हितेंद्र ठाकूरना धक्का बसणार?

११५ नगरसेवकांपैकी तब्बल १०७ नगरसेवक हे हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे आहेत. शिवसेनेचे ५ नगरसेवक आहेत, तर भाजप, मनसे यांचे प्रत्येकी एक-एक नगरसेवक आहेत. एक नगरसेवक अपक्ष निवडून आला आहे. वसई विरार महापालिकेवर हितेंद्र ठाकूर यांचं अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे.

हितेंद्र ठाकूर यांच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडण्यासाठी भाजप, महाविकास आघाडी आणि मनसेनेही आतापासूनच कंबर कसली आहे. भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक तर मनसेकडून पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे.

Exit mobile version