26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणसिद्धू, युवराजसिंग भाजपच्या ‘टीम’मध्ये?

सिद्धू, युवराजसिंग भाजपच्या ‘टीम’मध्ये?

लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता

Google News Follow

Related

भारताचे माजी क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धू आणि युवराज सिंग भाजपच्या ‘टीम’मध्ये येण्याची शक्यता आहे. युवराज सिंग गुरदासपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतो, असे म्हटले जात आहे.विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न योग्य प्रकारे न हाताळल्याने सिद्धू हे सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असताना त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सिद्धू हे त्यांच्या वक्तृत्व कौशल्यासाठी ओळखले जातात, परंतु काँग्रेसच्या पंजाब नेतृत्वाशी सध्या त्यांचा संघर्ष सुरू आहे. स्वतःच्या सभा घेऊन पक्षाच्या निर्देशांचे उघडपणे उल्लंघन करत आहेत.

सिद्धू हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात असले तरी पंजाबच्या माझा भागातील भाजपनेत्यांच्या मते ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतील आणि पंजाबमधून त्यांना लोकसभेचे तिकीटही मिळू शकेल. सिद्धू हे भाजपमध्ये प्रवेश करतील, याचे संकेत मिळत आहेत, असे भाजपचे सोमदेव शर्मा यांनी सांगितले आहे. ‘सिद्धू यांच्या पक्षप्रवेशाबाबत भाजपनेते आणि अन्य सक्षम उमेदवारांशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत आताच काही सांगता येणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. अमृतसर लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिकरीत्या भाजपचा बालेकिल्ला आहे. जर भाजपने अमृतसरमधून सिद्धू यांना तिकीट दिल्यास ते निश्चितच विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

जसप्रीत बुमहार कसोटी सामन्यातून बाहेर!

नेहरू-पटेल आणि मौलाना आझादही यूसीसी लागू करण्यास इच्छुक!

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार; तर असिफ अली झरदारी नवे राष्ट्रपती

पुणे पोलिसांकडून ४ हजार कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

मात्र काँग्रेसचे रमण बक्षी यांनी सिद्धू यांच्या भाजपप्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले. ‘एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारणारा नेता त्याचा करिश्मा आणि विश्वासार्हता गमावून बसतो,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाकडून सिद्धू यांना अमृतसरमधून लोकसभेचे तिकीट मिळू शकते.त्याचवेळी माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला गुरदासपूर येथून भाजपकडून लोकसभेचे तिकीट मिळू शकते, असे म्हटले जात आहे. सध्या या मतदारसंघाचे अभिनेते सनी देओल खासदार आहेत. युवराज सिंग याने नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती, त्यामुळे त्याच्या भाजपप्रवेशाचे संकेत मिळत आहेत, असे शर्मा म्हणाले. याआधीही भाजपने गुरदासपूर येथून सेलिब्रेटी उमेदवार दिले आहेत. येथून विनोद खन्ना आणि सनी देओल याने निवडणुका लढवल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा