गुजरात विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून गुजरातमध्ये नवीन सरकार स्थापन झाले. भूपेंद्र पटेल यांनी सलग दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशिवाय भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विक्रमी १५६ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला केवळ १७ जागा मिळाल्या, तर आम आदमी पक्षाला ५ जागा मिळाल्या.
गुजरातमधील नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह १७ मंत्री असतील. सोमवारी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळातील स्थान स्पष्ट झाले. राज्यात मुख्यमंत्र्यांशिवाय अनेक जुन्या-नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदे देण्यात आली आहेत. यामध्ये हर्ष संघवी ते परशोत्तम सोळंकी, कुंवरजित पानसेरिया, कनुभाई देसाई अशा नावांचा समावेश होता. तर दुसरीकडे महिला आमदार भानुबेन बाबरिया यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण
‘पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग’
‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले
एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण
पटेल मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या इतर आमदारांमध्ये भावनगर ग्रामीणचे आमदार परशोत्तम सोलंकी, डांगचे आमदार मुकेश पटेल, बच्चूभाई खबर आणि देवगड बारियाचे आमदार बच्चूभाई खबर यांचा समावेश आहे.
पारडीचे आमदार कनुभाई मोहनलाल देसाई, राजकोट ग्रामीणच्या आमदार भानुबेन बाबरिया, संतरामपूरचे आमदार कुबेर भाई दिंडोर, जसदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुवंजरजील बावलिया यांनी शपथ घेतली. याशिवाय मजुरा येथील आमदार हर्ष संघवी, निकोल विधानसभेचे जगदीश विश्वकर्मा यांनीही शपथ घेतली.