शिंदे-फडणवीस सरकार येताच बुलेट ट्रेन फास्ट ट्रॅकवर

शिंदे-फडणवीस सरकार येताच बुलेट ट्रेन फास्ट ट्रॅकवर

मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्प महाविकास आघाडी सरकाराच्या काळात ठप्प पडला होता. पण आता राज्यात शिंदे- फडणवीस सरकार येताच बुलेट ट्रेन प्रकल्प पुन्हा फास्ट ट्रॅकवर आला आहे. पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

शिंदे फडणवीस सरकार येताच सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. पालघर जिल्ह्यात ७१ गावांमधून बुलेट ट्रेन प्रकल्प जात असून, जिल्ह्यातील २१८ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केले जाणार आहे. आतापर्यंत ७० टक्क्यांपेक्षा जास्त जमीन संपादित करण्यात आली असून, शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हूणन देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग आला आहे.

यावर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘झुकुझुकु झुकुझुकु बुलेट गाडी आता राज्यातील सत्तांतराबरोबर विकासाची बुलेट ट्रेन सुसाट वेगाने सुटली आहे. डबल इंजिन सरकार असली की राज्याचा विकास कसा द्रुत गतीने होतो त्याचा हा उत्तम नमुना आहे’, असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.

हे ही वाचा:

अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी

मनी लॉन्डरिंग कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च दिलासा; ईडीविरोधातील सुनावणी

महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा सर्वाधिक लाभार्थी!

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भूसंपादन झाल्यानंतर विरोधात असलेले शेतकरी ही आता आपल्या जमिनी प्रकल्पासाठी देण्यास तयार झाले आहेत. आम्ही आमच्या जमिनी दिल्या तर योग्य मोबदला आणि योग्य पुनर्वसन केल जावं अशी मागणी या शेतकऱ्यांकडून सरकार समोर ठेवण्यात आली आहे.

Exit mobile version