सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तळगाव येथील एका मैदानात बैलांची झुंज आयोजित करण्यात आली होती. कुडाळ येथील दोन बैलांची ही झुंज आयोजित करण्यात आली होती. दरम्यान वेंगुर्ला तालुक्यातील आसोली गावातील विकी केरकर यांच्या मालकीचा बाबू नावाचा बैल झुंजी दरम्यान जखमी झाला होता. अखेर या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बैलांच्या झुंजीला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असताना हजारो लोकांच्या उपस्थितीत खासदार विनायक राऊत यांच्या गावात घेण्यात आलेल्या या बैल झुंजीला परवानगी कोणी दिली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
झुंजीत विजयी झालेला बैल हा कुडाळ नेरूर गावातील एका राजकीय पदाधिकाऱ्याचा होता म्हणून पोलीस गप्प होते का, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना आता पडला आहे. याप्रकरणी आता कारवाईची मागणी होत आहे. तसेच अशाप्रकारच्या झुंजी होऊ नयेत, असाही सूर उमटत आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्र राज्य कोरोना निर्बंध मुक्त! सगळे उत्सव उत्साहात साजरे करा!!
‘गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान का पता ना चले’…कव्वाली गायक नवाज शरीफची मुक्ताफळे! गुन्हा दाखल
‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’
आसाम, मणिपूर, नागालँडमधील AFSPA क्षेत्र कमी करण्याचा निर्णय
आता या बैलाच्या मृत्यूनंतर प्राणीप्रेमी असलेल्यांनी दु:ख व्यक्त केले असून मानवाच्या स्वार्थासाठी आनंदासाठी निष्पाप जीवांचा बळी घेतल्याच्या भावना सर्व स्तरांवरून व्यक्त केल्या जात आहेत.