संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; १६ विधेयके सूचीबद्ध!

१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; १६ विधेयके सूचीबद्ध!

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी झाली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लोकसभा आणि राज्यसभेत आर्थिक सर्वेक्षण २०२५ मांडतील.

सकाळी ११ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करून अधिवेशनाला सुरुवात होईल. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. लोकसभेत दुपारी १२ वाजता आणि राज्यसभेत दुपारी २ वाजता ते मांडले जाईल. अधिवेशनात महत्त्वाची विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये बँकिंग नियम आणि पर्यवेक्षण मजबूत करण्याच्या उद्देशाने बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक, २०२४ आणि रेल्वे (सुधारणा) विधेयक, २०२४ यांचा समावेश आहे, जे भारतीय रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करते.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण मांडल्यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन १८ व्या लोकसभेचा पहिला आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल. २ फेब्रुवारीला रविवार असल्याने सुट्टी असेल. यानंतर ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होईल.

हे ही वाचा : 

प्रयागराज: महाकुंभ परिसरात पुन्हा आग!

ही ‘तोंड पाटील’की बंद कधी होणार ?

अक्षय कुमारकडून पंतप्रधानांचा व्हिडीओ शेअर, म्हणाला-‘सल्ला आवडला’

स्वीडनमध्ये कुराण जाळणाऱ्या मोमिकला घातल्या गोळ्या!

तसेच वक्फ दुरुस्ती विधेयकापासून ते प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या मुद्द्यांवर विरोधक चर्चेची मागणी करण्याची शक्यता आहेत. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, वक्फ (सुधारणा) विधेयक, बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक, रेल्वे (दुरुस्ती) विधेयक, आपत्ती व्यवस्थापन (दुरुस्ती) विधेयक आणि तेलक्षेत्र (नियमन आणि विकास) दुरुस्ती विधेयकासह सरकारने १६ विधेयके विचारार्थ सूचीबद्ध केली आहेत.

गर्दी आटली...  गोधडी गुंडाळली! | Mahesh Vichare | Jarange Patil |

Exit mobile version