अर्थसंकल्पीय अधिवेशन या तारखेला होणार

अर्थसंकल्पीय अधिवेशन या तारखेला होणार

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून अधिवेशन दोन सत्रात पार पडणार आहे. अधिवेशनावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थित आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु होणार असून अधिवेशन दोन सत्रात पार पडणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत पार पडेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशन १४ मार्चला सुरु होऊन ८ एप्रिलला संपेल.

हे ही वाचा:

अयोध्येत योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उभी राहणार शिवसेना

ही दोन औषधे कोरोनावर प्रभावी

जवानांनी अशी साजरी केली लोहरी

मंत्री हाकणार ‘किल्ल्यांवरून’ कारभार

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट असून देशात सध्या २ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला संसदेच्या १४०९ कर्मचार्‍यांपैकी जवळपास ४०२ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यामध्ये २०० लोकसभा सदस्य, ६९ राज्यसभेतील सदस्य आणि १३३ कर्मचाऱ्यांना लागण झाली होती. मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेची पाहणी केली होती. नरेंद्र मोदी सरकार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Exit mobile version