‘भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प’

‘भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प’

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावर आता राजकीय स्तरातून प्रतिक्रीया दिल्या जात आहेत. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प देशाला विकासाकडे नेणारा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

यंदाचा अर्थसंकल्प हा भविष्याचा वेध घेणारा, बलशाली भारत तयार करणारा अर्थसंकल्प असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आर्थिक माप दंडावर, अधिक संतुलित, समावेशी आणि विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना समर्पित असा हा अर्थसंकल्प असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेती क्षेत्रात २.३७ लाख कोटींची तरतूद ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठी तरतूद असल्याचेही फडणवीस म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. संरक्षण उद्योगात देशांतर्गत उत्पादनावर भर ही आत्मनिर्भरची सर्वात मोठी पावती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पर्यावरणाच्या क्षेत्राचा विचार करताना इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

Budget 2022 : काय स्वस्त काय महाग?

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर सिंधुदुर्ग न्यायालयाबाहेर राडा

Budget 2022: शेती क्षेत्रात ड्रोन्सचा वापर होणार

Budget2022 : RBI द्वारा ‘डिजिटल रुपया’ सादर होणार

भारत जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या एका अर्थव्यवस्थेपैकी एक असल्याचे अर्थमंत्र्यांनी सुरुवातीला म्हटले आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीला आणखी बळकट करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे रेल्वे, विद्यार्थी, ५जी सेवा, रोजगार आदी क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत.

Exit mobile version