29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणबृजभूषण सिंह म्हणतात, २०२४ची निवडणूक लढवणार, लढवणार, लढवणारच!

बृजभूषण सिंह म्हणतात, २०२४ची निवडणूक लढवणार, लढवणार, लढवणारच!

ब्रृजभूषण सिंह यांनी त्यांच्या निवासस्थानापासून ते सार्वजनिक सभेच्या ठिकाणी रोड शोही आयोजित केला होता.

Google News Follow

Related

भाजपचे खासदार आणि कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा आरोप असलेले कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रृजभूषण शरणसिंह यांनी २०२४ची लोकसभा निवडणूक त्यांच्या कैसरगंज मतदारसंघातून लढवण्याची घोषणा रविवारी केली. पूर्व उत्तर प्रदेशातील कैसरगंज या लोकसभा मतदारसंघात ब्रृजभूषण यांची जाहीर सभा झाली. सहावेळा खासदार झालेल्या बृजभूषणसिंह यांनी त्यांच्यावरील आरोपांचे वारंवार खंडन केले आहे. गोंडा जिल्ह्यातील त्यांच्या कैसरगंज मतदारसंघात झालेल्या रॅलीनंतर ब्रृजभूषण शरणसिंह यांनी सन २०२४ची निवडणूक पुन्हा लढवण्याचा निर्धार केला.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही रॅली आयोजित करण्यात आली होती. ‘सन २०२४ची निवडणूक कैसरगंज येथून लढवणार, लढवणार आणि लढवणारच’, असा निर्धार त्यांनी केला. २०२४ची निवडणूक गोंडा किंवा अयोध्येतून लढवणार की नाही, या प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. केंद्रात भाजप पुन्हा बहुमताचे सरकार स्थापन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

‘आदिपुरुष’ची ऍडव्हान्स बुकिंगमध्ये बाजी, ३६ हजाराहून अधिक तिकिटे विकली गेली

… म्हणून शुभमन गिलला भरावा लागणार दंड!

फेडरर, नदालला पराभूत करण्यासाठी काय करावे लागेल, याचा सतत विचार केला!

राज ठाकरेंचे आवाहन; वाढदिवशी मला ही भेट द्या!

भाजपने जाहीर केलेल्या ‘महा जनसंपर्क अभियाना’अंतर्गत ही रॅली काढण्यात आली. त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या पोलिस तपासाचा हवाला देत त्यांनी अयोध्येतील ५ जूनची जाहीर सभा यापूर्वीच रद्द केली होती. कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत ते न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

कुस्तीपटू आंदोलकांनी सिंह यांच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची सर्व चौकशी १५ जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.   ब्रृजभूषण सिंह यांनी त्यांच्या निवासस्थानापासून ते सार्वजनिक सभेच्या ठिकाणी रोड शोही आयोजित केला होता. १९७५ची आणीबाणी आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शीख सुरक्षारक्षकांनी त्यांच्या केलेल्या हत्येनंतर झालेल्या शीखविरोधी दंगलींवरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. १९६० आणि ७०च्या दशकात मोदींसारखा पंतप्रधान असता तर शेजाऱ्यांनी बळकावलेला भारतीय भूभाग मोकळा झाला असता, असेही ते म्हणाले.

रॅलीदरम्यान सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला, परंतु ते ज्या पक्षातून भाजपमध्ये आले, त्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर त्यांनी टीका केली नाही. ‘याचा अर्थ त्यांना सर्व पर्याय खुले ठेवायचे आहेत. त्यांनी अलीकडेच कुस्तीपटूंच्या आंदोलनात सहभागी न झाल्याबद्दल सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे कौतुक केले होते. राजकारणात तुम्ही शक्यतांवर काम करता. जर ते भाजपचे तिकीट मिळवू शकले नाहीत तर हे निश्चितपणे दुसरा पर्याय बघतील,’ असे सेंटर फॉर ऑब्जेक्टिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे अथर सिद्दीकी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा