निवडणुकीपूर्वीच बीआरएसचे केटीआर राव गडगडले

निझामाबाद जिल्ह्यातील अरमूर येथील निवडणूक प्रचारादरम्यान घडली दुर्घटना

निवडणुकीपूर्वीच बीआरएसचे केटीआर राव गडगडले

तेलंगणात लवकरच निवडणुका होणार असून सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. सर्वच पक्षांकडून प्रचार सभा, पदयात्रा सुरू आहेत. अशाच एका प्रचार सभेदरम्यान, बीआरएसच्या नेत्याचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

तेलंगाणाचे मंत्री आणि बीआरएस नेते केटीआर राव हे एका टेम्पो ट्रॅव्हलर बसच्या टपावर उभे राहून प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत टपावर आणखी पाच- सहा कार्यकर्ते होते. छोट्याशा जागेत रेलिंगच्यामध्ये हे सर्वजण उभे होते. आजूबाजूने काही लोक चालत होते. अशातच बस सुरु असताना अचानक ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबला आणि त्यामुळे टपावर उभे असलेल्या लोकांचा तोल गेला. शिवाय सर्वांच्या वजनामुळे टपावर लावलेलं रेलिंग तुटलं आणि उभे असलेले सर्वजण खाली कोसळले. यामध्ये मंत्री केटीआर राव हे देखील होते. यात त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

हे ही वाचा:

…आणि फिजिओच्या सल्ल्यामुळे कोलमडलेला मॅक्सवेल पुन्हा उभा राहिला

मुलाला चिरडणाऱ्या गाडीचा पित्याने लावला आठ वर्षांनी शोध!

मानवी तस्करीप्रकरणी ४४ जणांना अटक!

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दहशतवादी ठार

निझामाबाद जिल्ह्यातील अरमूर येथे निवडणूक प्रचारादरम्यान ही दुर्घटना घडली. अचानक ही घटना घडल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. देशात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये निवडणुकींचा रणसंग्राम रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मैदानात उतरले असून जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच काही दिवसांपूर्वी तेलंगणामधील खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करताना रेड्डी यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आणि यात रेड्डी हे गंभीर जखमी झाले आहेत.

Exit mobile version