भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यविधी कुठे करायचा यावरून काँग्रेसने वाद उत्पन्न केला. त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपाने मनमोहन सिंग यांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे बंधू मनोहर राव यांनी काँग्रेसची झाडाझडती घेतली आहे.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात की, नरसिंहराव यांच्या कॅबिनेटमध्ये मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. त्यांना नरसिंहराव यांनी मोकळा हात दिला होता. भारतातील परिस्थिती बदलण्यासाठी ही मोकळीक देण्यात आली होती. मनमोहन सिंग यांनी त्यामुळे त्या काळात हिमतीने काम केले. एकप्रकारे दोघेही गुरुशिष्यासारखे होते.त्यामुळेच आज भारताचा विकास झाला. त्यांच्या निधनानंतर अनेकांना शोक व्यक्त केला. आमच्या परिवारातर्फेही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
मनोहर राव म्हणाले की, काँग्रेसचे नेते भाजपावर आरोप करत आहेत. मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार नीट केले नाहीत असा आरोप केला जात आहे. त्यांनी खरेतर २० वर्षे मागे वळून पाहायला हवे. मनमोहन सिंग यांच्या काळात त्यांचे गुरू पीव्ही नरसिंहराव यांना कशाप्रकारचा आदर मिळाला होता? त्यांच्या अंत्यविधीसाठी छोटी जमीनही मिळू शकली नाही. आज मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान, उपाध्यक्ष जवळपास सगळे कॅबिनेट तिथे आले होते. पण नरसिंहराव यांच्या निधनानंतर कोण आले? सोनिया गांधीही आल्या नव्हत्या. त्या ऑल इंडिया काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, मग पंतप्रधानांच्या निधनानंतर त्यांना हैदराबादला येता आले नसते? काँग्रेसने तर नरसिंहराव यांचा एक पुतळाही उभारला नाही. भारतरत्न हा सन्मान तुम्ही नरसिंहराव यांना देऊ शकला नाहीत. मग कोणता आदर दिला?
हे ही वाचा:
मौलाना बरेलवी म्हणतात, नवे वर्ष साजरे करणे हा इस्लाममध्ये गुन्हा
बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांकडून हिंदू व्यक्तीची हत्या, घराबाहेरील झाडावर लटकवले!
लडाखमध्ये पँगाँग किनाऱ्याला १४ हजार फुटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा!
ज्वेलर्स मालकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या कटात संपादक
मनमोहन सिंग यांना नरेंद्र मोदी सरकारने जो आदर दिला तो अगदी योग्यच आहे. इतके पंतप्रधान दिवंगत झाले. पण त्यांच्यासाठी काँग्रेसने काय केले. मोदींनी सगळ्या पंतप्रधानांच्या आठवणींचा संग्रह केला, उद्या तिथे मनमोहन सिंग यांच्याही आठवणी जतन केल्या जातील.