ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे आजपासून दोन दिवसांसाठी भारत दौऱ्यावर आले आहेत. गुजरातमधून बोरिस यांनी भारत दौऱ्याची सुरवात केली आहे. गुरुवार, २१ एप्रिल रोजी त्यांचे अहमदाबाद येथे आगमन झाले असून त्यांचे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले आहे. त्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाला भेट दिली. शुक्रवार, २२ एप्रिल रोजी बोरिस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत.
#WATCH | Prime Minister of the United Kingdom Boris Johnson visits Sabarmati Ashram, tries his hands on 'charkha' pic.twitter.com/6RTCpyce3k
— ANI (@ANI) April 21, 2022
आज बोरिस यांनी गुजरातमधील विद्यापीठ आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देऊन आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात केली आहे. त्यांच्या या दौऱ्यात काही प्रमुख उद्योगांबद्दल घोषणा होणार आहेत. ब्रिटन आणि भारत दरम्यान सॉफ्टवेअर अभियांत्रिकीपासून आरोग्यापर्यंतच्या क्षेत्रात १ अब्ज पाउंड पेक्षा जास्त नवीन गुंतवणूक आणि निर्यातीसाठी डील होणार आहेत. यामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये जवळपास ११ हजार नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
अबब! मविआच्या मंत्र्यांनी स्वतःवरील उपचारासाठी किती खर्च केला बघा?
सर्वोच्च न्यायालयात सगळेच वकील म्हणाले, जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमणे!
गृह विभागाचा भोंगळ कारभार सुरूच! बदल्यांच्या आदेशाला २४ तासांच्या आत स्थगिती
‘अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रकार समोर आला पाहिजे’
व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा आणि संरक्षण आणि हरित ऊर्जा या सर्व क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी बोरिस यांचा हा दौरा आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या बोरिस यांच्या दौऱ्यात या सर्व मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे त्यांच्या सांगण्यात आले आहे. तसेच बोरिस यांचा हा दौरा इंडो-पॅसिफिकवर क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यावर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरिस यांच्यात युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्यात असाही करार होऊ शकतो, ज्यामुळे ब्रिटनचा २०३५ पर्यंत व्यापार वाढून २८ पाउंड अब्जपर्यंत पोहचू शकतो.