भारतासह जगभरातील अनेक कुटुंबं याच्यामुळे आजही मानसिक त्रास सहन करत आहेत.अनेकांना अजूनही न्याय मिळालेला नाही, असं पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश खासदारानीं म्हंटल आहे.
बीबीसीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला एक माहितीपट सध्या चर्चेचा विषय झालं आहे. यावरून भारतात सध्या सुरू झालेली चर्चा आता थेट ब्रिटिश संसदेपर्यंत जाऊन पोहोचली आहे. हा माहितीपट म्हणजे मोदींविरोधातील अपप्रचाराचा एक भाग असल्याची भूमिका गुरुवारी केंद्र सरकारने मांडल्यानंतर त्यावर थेट ब्रिटनच्या संसदेमध्ये चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश खासदाराने हा मुद्दा तिकडच्या संसदेत उपस्थित केल्यावर त्यावर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मोदींची बाजू घेत या खासदारांनाच सुनावलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
ऋषी सुनक यांनी खासदारालाच सुनावलं!
हुसेन यांच्या प्रश्नावर ऋषी सुनक यांनी लागलीच उत्तर देत त्यांचा मुद्दा खोडून काढला.“यासंदर्भात ब्रिटिश सरकारची भूमिका कायम आहे. तिच्यात अजिबात बदल झालेला नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचं कुठेही समर्थन करत नाही. पण सन्माननीय सदस्य इम्रान हुसेन यांनी मांडलेल्या भूमिकेशी मी असहमत आहे”, अशा शब्दांत ऋषी सुनक यांनी हुसेन यांचा दावा फेटाळून लावत ब्रिटिश सरकारची या वादावर भूमिका स्पष्ट केली आहे. गुजरात दंगली घडल्या, त्यावेळी देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावरून गेल्या २० वर्षांत खूप मोठं राजकारण आपल्याला पाहायला मिळालं यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले आहेत.
हे ही वाचा:
भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची
महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड
गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!
नेमकं काय घडलं?
ब्रिटनच्या संसदेमधील पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसेन यांनी मोदी गुजरात दंगलींमध्ये सहभागी होते असा दावा करत ब्रिटिशचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भूमिका मांडण्याची मागणी केली. “ब्रिटनच्या परराष्ट्र खात्याच्या माहितीनुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दंगलींमुळे झालेल्या हिंसाचारासाठी थेट जबाबदार होते. भारतासह जगभरातील अनेक कुटुंबं यामुळे आजही मानसिक त्रास सहन करत आहेत. अनेकांना अजूनही न्याय मिळालेला नाही. पंतप्रधान ऋषी सुनक आपल्या परराष्ट्र विभागाच्या या भूमिकेशी सहमत आहेत का?” असा सवाल इम्रान हुसेन यांनी उपस्थित केला.
इंग्लंडच्या पंतप्रधानांची भारताच्या पंतप्रधानांना साथ !
पाकिस्तानच्या खासदाराची पळता भुई थोडी !#RushiSunak #Modiji #Pakistan #India #England #britishparliament #narendramodi pic.twitter.com/uTXDM2JGlv
— Chandrakant Dada Patil – मातीशी जोडलेला माणूस (@CDPMatitalaM) January 20, 2023
बीबीसीच्या माहितीपटामुळे गुजरातमधील हिंसाचार पुन्हा चर्चेत
बीबीसीच्या माहितीपटामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.यासंदर्भात भारताची भूमिका मांडताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माहितीपटावर टीका केली. “आम्हाला माहीत नाही की या माहितीपटाच्या मागे नेमका काय उद्देश आहे, परंतु हा माहितीपट निष्पक्ष नाही. हा पंतप्रधान मोदींविरुद्धचा अपप्रचार आहे. हा माहितीपट भारतात प्रदर्शित केला गेला नाही आणि भारताविरोधात एक विशेष प्रकारच्या अपप्रचाराचे कथानक या माहितीपटात चालवण्याचा प्रयत्न आहे. माहितीपटामुळे असे दिसून येते की याच्याशी निगडीत लोक आणि संघटना एका विशिष्ट विचारधारेचे आहेत. कारण त्यामध्ये काहीही तथ्य नाहीत. यामधून गुलामीची मानसिकता दिसून येते”,असं बागची पुढे म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईतील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही मोदींची माणसं आहोत,असे वक्तव्य केल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली. सूनक यांनीही आपण असे आरोप खपवून घेणार नाही,असे सुनावले. एकप्रकारे आपण मोदी यांच्या पाठीशी आहोत,असे सुनक यांनी सुचविले आहे