ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन येणार भारत दौऱ्यावर!

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन येणार भारत दौऱ्यावर!

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे एप्रिल महिन्याच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन यांच्यातील शेवटची भेट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्लासगो शिखर परिषदेदरम्यान झाली होती.

गेल्या वर्षी पंतप्रधान जॉन्सन यांचा भारत दौरा दोनदा रद्द करण्यात आला होता. जानेवारीत ते पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र, त्यावेळी देशातील कोरोना संकटामुळे हा प्रवास शक्य झाला नाही. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस २१ एप्रिलला जॉन्सन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. G-7 चे अध्यक्ष या नात्याने ब्रिटनने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिले होते. मात्र, महामारीमुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा होऊ शकला नाही.

मे २०२१ मध्ये पंतप्रधान मोदी आणि जॉन्सन यांच्यामध्ये वर्चुअल बैठक झाली होती. त्या बैठकीत २०३० च्या रोडमॅपवर चर्चा झाली होती. हा रोडमॅप आरोग्य, हवामान, व्यापार, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्रातील यूके-भारत संबंधांसाठी एक फ्रेमवर्क प्रदान करणारा असणार आहे.

हे ही वाचा:

रामदूत, अंजनि-पुत्र हनुमान

दोन एक्स्प्रेस धडकल्या; मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीत

‘द काश्मीर फाइल्स’ नंतर आता येणार ‘द दिल्ली फाइल्स’!

‘देशातल्या मोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटायची’

बैठकीदरम्यान, दोन्ही देशांनी संबंधांचा दर्जा ‘सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’ मध्ये वाढवण्यासही सहमती दर्शवली होती. व्यापार कराराच्या चर्चेदरम्यान या बैठकीत २०३० पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार दुप्पट करण्याचे मान्य करण्यात आले. सध्या यूके आणि भारत यांच्यात दरवर्षी सुमारे २ हजार २९२ अब्जचा व्यापार होतो.

Exit mobile version