ब्रिजेश सिंह यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याचे उदाहरणच घालून दिले आहे!

देवेंद्र फ़डणवीस यांनी केले कौतुक

ब्रिजेश सिंह यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याचे उदाहरणच घालून दिले आहे!

महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे महासचिव ब्रिजेश सिंह यांनी मालाड पश्चिममधून अर्ज दाखल केला होता. तिथे विनोद शेलार यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. ब्रिजेश सिंह यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर ब्रिजेश सिंह यांनी अर्ज मागे घेतला. त्यासंदर्भात मग फडणवीस यांनी ‘एक्स’वर आपल्या भावना व्यक्त करताना ब्रिजेश सिंह यांच्या निर्णयाचे कौतुक केले.

फडणवीसांनी म्हटले होते की, महाराष्ट्र भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे महासचिव ब्रिजेश सिंह यांनी पक्षाच्या हितार्थ आपले नामांकन मागे घेतले त्यामुळे एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या रूपात त्यांनी एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. ब्रिजेश सिंह यांनी घेतलेला हा निर्णय संघटनेच्या प्रती समर्पण आणि त्यागाचे प्रतीक आहे.

ब्रिजेश सिंह यांच्या या निर्णयामुळे हे सिद्ध झाले की, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेच्या पलिकडे जाऊन त्यांच्यासाठी पक्षाचे हित आणि विचारधारा यांना अधिक महत्त्व आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा आणण्याची खुमखुमी, विधानसभेत प्रस्ताव मंजूर!

अमेरिकेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प!

उद्धव ठाकरेंनी मुंब्र्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून दाखवावा!

‘काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला’

ब्रिजेश सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ‘एक्स’वर पोस्ट लिहित म्हटले की, मालाडमधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणे हा माझ्यासाठी कठीण निर्णय होता. अनेक ज्येष्ठ नेते आणि शुभचिंतकांनी मला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करून या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितले. हा अर्ज मागे घेण्याची विनंतीही त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांचा संयम, त्याग आणि पक्षाप्रती त्यांची असलेली निष्ठा हा नेहमीच प्रेरणास्रोत राहिलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला विनंती केली तेव्हा त्यांच्या शब्दांमुळे मला माझ्या कर्तव्याची जाणीव झाली. त्यामुळे अखेरीस देश आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा म्हणून आणि माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार मी अर्ज मागे घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी हे माझ्या जीवनाचे अभिन्न अंग आहे आणि राहतील.

Exit mobile version