कान्होली गावातील महिलेचा अजित पवारांना सवाल
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार अजित पवार हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी काही लोकांनी अजित पवार यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या आहेत. यावेळी कान्होली गावातील वर्षा ईटनकर यांनी आपल्या समस्या अजित पवार यांच्यासमोर मांडल्या.
“कान्होली गावात दूषित पाणी येतं, गढूळ पाणी आम्हाला प्यावं लागतंय. अजितदादा तुमच्यासाठी बाहेरून पाण्याच्या बाटल्या आणल्या गेल्या. आम्ही अशा पाण्याच्या बाटल्या पहिल्यांदा या गावात बघितल्यात. तुम्ही आणि रणजित कांबळे यांनी हे पाणी का नाही पिलं? बाहेरुन बाटल्या का आणल्या?” असा संतप्त सवाल त्यांनी अजित पवार यांना विचारला.
महापुरात मोठं नुकसान झालंय. सगळे येऊन बघून जातात. मदत कुणी करत नाही. गावाचं पुनर्वसन झालेलं नाही. भिंतींना ओल आलीये. सरकारी मदत कधी मिळणार याची आम्ही वाट बघतोय, अशा समस्या या महिलेने अजित पवारांपुढे मांडल्या आहेत.
हे ही वाचा:
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण सोडत
महाराष्ट्रात तपास करण्यासाठी सीबीआयला घ्यावी लागणार परवानगी
नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; सतर्क राहण्याचा इशारा
पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश
अजित पवार हे दोन दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. अनेक ठिकाणी अजूनही पाऊस पडत असून हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकरी अडचणीत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना आधी मदत द्या, अशा असं अजित पवार यांनी म्हटले आहे.