चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांचा ‘या’ नावावर दावा

चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांचा ‘या’ नावावर दावा

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय शनिवारी रात्री जाहीर केला. या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. यासोबतच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव वापरता येणार नसल्याचंही निर्णय दिला आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना या नावाच्या पुढे उपनाव जोडता येणार असल्याचंही स्पष्ट केले आहे. त्यानुसार शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाने आपल्या गटासाठी एकच नाव सुचवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच नावाची मागणी केली आहे. ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ या नावाची दोन्ही गटाने मागणी केली आहे. त्यामुळे आता नवा पेच निर्माण झाला आहे. आता, दोन्ही गटाने मागणी केल्याने निवडणूक आयोगाकडून हे नावदेखील गोठवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

दोन्ही गटांना शिवसेना नाव वापरता येणार नाही. मात्र त्यांना शिवसेनेशी संबंधित नाव वापरता येईल. त्यामुळे शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) अशी नावे घेतली जाऊ शकतात. दोन गट एकाच चिन्हावर दावा सांगतात, तेव्हा निवडणूक आयोग ते चिन्हच गोठवतो असा इतिहास आहे. ठाकरे आणि शिंदे गटाला याची कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी दसरा मेळाव्यातून नव्या चिन्हाबद्दल संकेत दिले होते.

हे ही वाचा:

शरद पवार म्हणतात, बॉलिवूडला टॉप पोझिशनला पोहोचवण्यात मुस्लिमांचं मोठं योगदान

उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर

अरुण गोविल काय म्हणाले ‘आदिपुरुष’ बद्दल

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का

दरम्यान, गेल्या वर्षी राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षात फूट पडली. या पक्षाची स्थापना रामविलास पासवान यांनी केली. पासवान यांचे पुत्र चिराग पासवान आणि पासवान यांचे बंधू पशुपती पारस यांच्यामध्ये पक्ष विभागला. त्यावेळी त्यांनी राष्ट्री लोक जनशक्ती पक्ष आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) अशी नावं घेतली होती.

Exit mobile version