युनायटेड किंग्डमचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन हे सध्या दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. त्यांच्या या बहुचर्चित दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले खास दोस्त असे बोरीस जॉन्सन यांनी म्हटले आहे. यामुळे भारत आणि युनायटेड किंग्डम या दोन देशांमध्ये असलेले मैत्री संबंध किती घट्ट आहेत याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे
यावेळी बोलताना जॉन्सन यांनी भारतीयांच्या आदरातिथ्याचे तोंडभरून कौतुक केले. आपल्या स्वागतासाठी सर्वत्र लागलेले बॅनर आणि होर्डिंग्स बघून आपल्याला सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन असल्यासारखे वाटू लागले असे बोरीस जॉन्सन यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
अमित मिश्राची फिरकी, इरफान पठाण क्लीन बोल्ड
गुरु तेग बहादूर शौर्याचा आदर्श ठेवतात; प्रकाशपर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश
लवकरच विजय मल्ल्या, नीरव मोदी भारताच्या स्वाधीन
‘हिंदुत्वावर मते मागणारे मुख्यमंत्री हनुमान चालिसाला विरोध करतात!’
जॉन्सन यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदींचे जन्मगाव असलेल्या गुजरात मध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याचेही जॉन्सन यांनी खूप कौतुक केले. जगात इतरत्र कुठेही मला अशा प्रकारचे स्वागत अनुभवायला मिळेल असे वाटत नसल्याचे बोरीस जॉन्सन यांनी म्हटले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला ते राज्य पहिल्यांदा बघताना खूपच आनंद झाल्याचेही जॉन्सन यांनी नमूद केले
बोरीस जॉन्सन यांनी आज राजघाटाचे दर्शन घेऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. जॉन्सन यांच्या या दोन दिवसीय दौर्यात भारत आणि युनायटेड किंगडम या दोन देशांमध्ये संरक्षण, सामरिक आणि आर्थिक भागीदारी वाढवण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा झाली.