इंग्लंडमध्ये राजकीय सत्तासंघर्षात आता पंतप्रधानांवर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या ४८ तासात त्यांच्या ४० हून अधिक मंत्री आणि खासदारांनी राजीनामा दिला आहे. बोरिस यांच्या सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव वाढत चालल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे.
कालच ब्रिटनचे आरोग्य सचिव साजिद जविद आणि अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ३६ तासांपूर्वी मंत्री झालेल्या मिशेल डोनलन यांनी देखील राजीनामा दिला आहे. त्यानंतर गुरुवार, ७ जुलै ला संध्याकाळी ५ च्या सुमारास बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा जाहीर करताना बोरिस जॉन्सन यांनी राष्ट्राला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. आता पुढे इंग्लंडचे पंतप्रधान कोण याचा निर्णय २१ जुलै होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा:
रूमचं छत कोसळलं, आमदार शहाजी बापू बचावले
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला
पोलिसांनी तेलंगातील तीन पीएफआय कार्यकर्त्यांना केली अटक
उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
बुधवारी संध्याकाळपर्यंत १७ कॅबिनेट, १२ सचिव आणि परदेशात नियुक्त केलेलय प्रतिनिधींनी राजीनामे दिले आहेत. त्यांनतर सुद्धा राजीनाम्याची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्यांनी बोरिस यांची कार्यपद्धती, महामारीच्या काळात करण्यात आलेल्या पार्ट्या आणि काही नेत्यांचा सेक्स स्कँडलमधील सहभाग, हे नाराजीचे मुद्दे असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याने यूकेच्या अर्थव्यवस्थेचे पुढे काय होणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.