बोरिस जॉन्सन यांचा खासदारकीचा राजीनामा

पंतप्रधानपदानंतर जॉन्सन यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला

बोरिस जॉन्सन यांचा खासदारकीचा राजीनामा

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणी कमी व्हायचं चित्र दिसत नाही. पंतप्रधानपदानंतर आता जॉन्सन यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर त्या जागेवर पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शुक्रवार, ९ मे रोजी रात्री त्यांनी अचानक हा मोठा निर्णय घेतला. पार्टीगेट प्रकरणात संसदेची दिशाभूल केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचं जाहीर केलं. पार्टीगेट प्रकरणामुळेच त्यांना यापूर्वी पंतप्रधान पद गमवावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी आता खासदार पदाचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे या जागेवर पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

धुळ्यात अनधिकृत टिपू सुलतान स्मारक रात्री उशिरा हटविले

सादरीकरणावेळी मंचावरचं भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन

पालखी मार्ग, वारकऱ्यांची विश्रांती स्थाने, पाण्याची व्यवस्था उत्तम राखा!

भाई जगतापांची गच्छंती, वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष

नेमकं प्रकरण काय?

जगावर करोना सारख्या महामारीचे सावट असताना अनेक देशांमध्ये टाळेबंदी करण्यात आली होती. तसेच करोनाकाळात ब्रिटनमध्येही टाळेबंदी आणि संचारबंदी सुरु होती. तेव्हा निर्बंधांच्या काळातही डाउनिंग स्ट्रीट या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं. ‘पार्टीगेट’ या नावाने हे प्रकरण चर्चेत आलं. तसेच, संसदेची दिशाभूल केल्याचा आरोपही जॉन्सन यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.

Exit mobile version