उत्तर प्रदेशमधील अमेठी लोकसभा मतदार संघात २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघाकडे विशेष लक्ष असणार आहे. २०१९ मध्ये भाजपाच्या स्मृती इराणी या मतदार संघातून निवडणून आल्या होत्या. त्यापूर्वी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. यंदाही येथून स्मृती इराणी उभ्या असून याकडे लक्ष असणार आहे. मतदानापूर्वी स्मृती इराणी यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत गांधी कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“अमेठीतील पराभवाचं त्यांना एवढं दुःख का वाटतं? ते लोक म्हणायचे की, स्मृती इराणी यांची योग्यता नाही. जे लोक बूथ लुटायचे, ते एका सर्वसामान्य कार्यकर्तीकडून पराभूत झाले. १९९० च्या दशकात गांधी कुटुंबातील एका सदस्याने एका ज्येष्ठ पत्रकाराला सांगितलं होतं की त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्ते त्यांच्यासाठी बूथ लुटतात,” अशी टीका स्मृती इराणी यांनी केली आहे. न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट पाहू शकता. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, महात्मा गांधींचे नातू राजमोहन गांधी यांनी राजीव गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली तेव्हा काँग्रेसने ९७ बूथवर कब्जा केला होता, असा गंभीर आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.
हे ही वाचा :
गाझामधून तीन ओलिसांचे मृतदेह ताब्यात
‘आप’मधील वातावरण ‘गैरवर्तन’, ‘गुंडगिरी’चे असून ‘ब्लॅकमेल संस्कृती’ने काम सुरू
स्वाती मालीवाल यांना मारहाण प्रकरणी पोलिसांनी बिभव कुमारच्या मुसक्या आवळल्या
किर्गिस्तानमधील हिंसाचारात भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थी लक्ष्य
२०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी राहुल गांधींच्या बाजूने १ लाख मते टाकली होती, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच मुलायम सिंह यादव यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सोनिया गांधींनी त्यांना राहुल गांधींच्या बाजूने १ लाख मते देण्याची विनंती केली होती असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे.