डॉ. सच्चिदानंद शेवडेंच्या पुस्तकाचे होणार आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते प्रकाशन

डॉ. सच्चिदानंद शेवडेंच्या पुस्तकाचे होणार आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते प्रकाशन

महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ‘डावी विषवल्ली’ या पुस्तकाचे आज गोरेगाव येथे प्रकाशन होणार आहे. सच्चिदानंद शेवडे यांचे हे ५० वे पुस्तक आहे. भाजपा आमदार आणि ‘न्यूज डंका’ चे सल्लागार संपादक अतुल भातखळकर यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन होणार आहे.

शनिवार, ४ डिसेंबर हा दिवस गोरेगाववासीयांसाठी वैचारिक पर्वणीचा ठरणार आहे. कै.आनंद जयराम बोडस स्मृती व्याख्यानाच्या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे. ‘डाव्या विचारांचे आव्हान’ या विषयावर शेवडे आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमासाठी गोरेगावमधील श्रोते उत्सुक झालेले पाहायला मिळत आहेत.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या चुकीमुळे वाढले नारायण राणेंचे सुरक्षा कवच?

चिडलेले शेतकरी शांत होऊन गेले! कंगनाने असे काय केले?

‘पुणेकरांच्या मनात केवळ आणि केवळ भाजपा आहे’

पाकिस्तानात ईश्वरनिंदेवरून एका श्रीलंकन नागरिकाची निघृण हत्या

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा शेवडे यांच्या डावी विषवल्ली या नव्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. राष्ट्रीय विचारांचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. या आधी गुरुवार, २ डिसेंबर रोजी डोंबिवली येथे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले होते.

गोरेगाव पूर्व येथील मसूराश्रम या ठिकाणी हे व्याख्यान होणार आहे. रात्री ८ वाजता हे व्याख्यान सुरु होईल. राज्य सरकारची सर्व कोविड प्रतिबंधक नियमावली पाळून हा कार्यक्रम पार पडणार आहे.

Exit mobile version