पश्चिम बंगालमध्ये भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर क्रूड बॉम्बने हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर तीन क्रूड बॉम्ब फेकण्यात आले आहेत. भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर क्रूड बॉम्बने कोणी आणि का हल्ला केला हे सध्या स्पष्ट नाही.
घराबाहेर सुरक्षा दलांच्या तैनाती दरम्यानच्या या हल्ल्यातून अनेक प्रश्नही उद्भवतात. खासदारांच्या घरावर झालेल्या या हल्ल्याचा भाजपने निषेध केला आहे.पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनीही या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हल्ला झाला तेव्हा अर्जुन सिंह घरी नव्हते, ते दिल्लीत होते. त्यांचे कुटुंबीय घरी उपस्थित होते. सध्या अर्जुन सिंग यांच्या घराच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची आता तपासणी केली जात आहे.
२०१० मध्ये लोकसभा निवडणुकीत अर्जुनसिंह यांनी तृणमूल उमेदवाराचा पराभव केल्यानंतर याभागातील स्थिती अधिक गंभीर झाली होती. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांनी यासंदर्भात म्हटले की, पश्चिम बंगालमध्ये हिंसा कमी होण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर बॉम्ब हल्ला कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण करते. हल्लेखोरांवर पोलिसांनी यावर कडक कारवाई करावी. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी या हल्ल्यावर सांगितले की, हे असे हिसेंचे प्रकार सातत्याने घडत आहे. अर्जुन यांचा पक्षप्रवेश झाल्यापासून हे घडत आहे.
हे ही वाचा:
दाऊद टोळीचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मृत्यू
ही आहे ठाकरे सरकारची ‘ऐतिहासिक’ कामगिरी
…तर उत्तेजके घेणारे खेळाडूही ठरू शकतील राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र!
खरमाटे यांच्याकडे ७५० कोटींची प्रॉपर्टी
दार्जिलिंगचे भाजप खासदार राजू बिस्ता यांनी या प्रकरणी एनआयएच्या चौकशीची मागणी उपस्थित केली आहे. त्यांनी लिहिले की पश्चिम बंगालमधील पोलिसांनी डोळेझाक केली आहे आणि ते टीएमसी गुंडांवर कारवाई करत नाहीत. मी या प्रकरणी एनआयए चौकशीची विनंती करतो.