ईशान्य भारतातील मणिपुरी या राज्यात आज विधानसभेचे मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मणिपूरमधील दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पण मतदान सुरू होण्याच्या काही तास आधीच मणिपूर मधून हिंसाचाराच्या बातम्या देताना दिसत आहेत. मणिपूरमध्ये एका राजकीय कार्यकर्त्याच्या घराबाहेर बॉम्बस्फोट झाल्याची घटना पुढे आली आहे.
भारतीय जनता पार्टीतून निलंबित करण्यात आलेले नेता बिजोय यांच्या घराबाहेर हा बॉम्बस्फोट झाला आहे. काही अज्ञात हल्लेखोरांनी क्रूड बॉम्ब फेकण्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे. मणिपूरमधील लांफेल या भागात ही घटना घडली आहे. शुक्रवार, ४ मार्च रोजी रात्री हा हल्ला करण्यात आला आहे. मास्क घालून आलेल्या दोन दुचाकीस्वारांकडून हा हल्ला करण्यात आला आणि सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
युद्ध थांबवण्यासाठी रशियाने युक्रेनसमोर ठेवल्या या अटी
…आणि लिबियातून भारतीयांची जलदगतीने सुटका केल्याच्या बतावणीत काँग्रेस मग्न
रशिया काही तास बॉम्बवर्षाव करणार नाही…हे आहे कारण!
मणिपूरमध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार
विजय हे भारतीय जनता पार्टीचे नेते असून गेल्याच महिन्यात त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली होती. शिस्तभंग केल्याच्या आरोपावरून त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना, “राजकीयदृष्ट्या मला शांत करण्यासाठी हा हल्ला म्हणजे एक धमकी असावी” असे त्यांनी म्हटले आहे. तर पोलीस या संपूर्ण हल्ल्याचा तपास करत आहेत.