रिंकू शर्मा हत्त्येप्रकरणी बॉलीवूडमधील ‘गॅंग’ गप्प का?

रिंकू शर्मा हत्त्येप्रकरणी बॉलीवूडमधील ‘गॅंग’ गप्प का?

दिल्लीमध्ये राम मंदिरासाठी निधी गोळा करत असताना रिंकू शर्मा या तरुणाला १४-१५ मुसलमानांनी सूरा भोसकून मारले. रिंकू शर्मा हा तरुण बजरंग दलाचा कार्यकर्ता होता. जय श्रीरामची घोषणा दिल्यामुळे रिंकू शर्माची हत्त्या करण्यात आल्याचा आरोप रिंकू शर्माच्या घरच्यांनी केला आहे.  रिंकू शर्माचे आई आणि वडील दोघांनीही रिंकू शर्माच्या हत्त्येमागे जय श्रीराम ही घोषणा त्याने दिल्याचे कारण असल्याचे सांगितले होते.

रिंकू शर्मा हा बुधवारी एका बर्थडे पार्टीला गेला होता. पार्टीवरुन परत येत असताना त्याला त्याच्या शेजारी राहणा-या या मुलांनी रस्त्यात घेरले आणि त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. रिंकूच्या भावाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे धारदार हत्यारं सुद्धा होती. ती हत्यारं उगारुन ते रिंकूला धाक दाखवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे एकटा असलेला रिंकू वाद वाढू नये म्हणून घाबरत धावत घरी आला. पण डोक्यात राख घालून घेतलेले त्याचे आरोपी, त्याचा पाठलाग करत त्याच्या घरापर्यंत पोहोचले. त्यांनी जबरदस्तीने घरात घुसून शर्मा कुटुंबियांना मारहाण केली. शर्मा कुटुंबीय या प्रकाराने एकदम घाबरुन गेले. त्यांना रिंकूची चिंता वाटू लागली. अचानक झालेल्या हल्ल्याने काय करावे हे त्यांना सूचेना. शेवटी चेव चढलेल्या या आरोपींनी सोबत आणलेला सुरा बाहेर काढला आणि त्याच्यावर वार करायला सुरुवात केली. हे पाहून त्याच्या आई-वडिलांनी आक्रोश करायला सुरुवात केली. पण त्यांनाही गप्प करत त्यांनी अखेरीस रिंकूच्या पाठीत सुरा खुपसला आणि विव्हळणा-या रिंकूची धडपड अखेर शांत झाली. यानंतर हे आरोपी आसुरी आनंदाने तिथून निघून गेले. तर रिंकूच्या आई-वडिलांच्या डोळ्यात फक्त अश्रू आणि त्या अश्रूंच्या आड अदृश्य झालेला २५ वर्षांचा त्यांचा तरुण मुलगा रिंकू. जो आता रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडला होता.

हे ही वाचा:

रामनिधी संकलन करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या; आरोपींना अटक

२८ सप्टेंबर २०१५ रोजी उत्तर प्रदेशच्या दादरी जवळ घरात गोमांस असल्याच्या संशयामुळे जमावाने मोहम्मद अखलाख नावाच्या एका व्यक्तीची घरात घुसून हत्त्या केली होती. त्यावेळी बॉलीवूड सेलिब्रेटी आणि ‘इंटलेच्युअल्स’ यांनी ‘अवॉर्ड वापसी’ सुरु केली होती. अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनीं ‘नॉट माय इंडिया’ असे बॅनर घेऊन फोटो समाज माध्यमांमध्ये पसरवले होते. तेंव्हाही घरात घुसून  जमावाने मारले होते आणि आता रिंकू शर्मीलाही जमावाने घरात घुसून मारले आहे. तेंव्हा मोठ्या प्रमाणात निषेध करणारे आणि अश्रू चालणारे अभिनेते आणि बुद्धिजीवी हे आज रिंकू शर्माच्या हत्त्येवर पूर्णपणे गप्पा आहेत.

अशाच पद्धतीने ५ एप्रिल २०१७ ला राजस्थानच्या लाव्हारमध्येही पेहलू खान नावाच्या एका व्यक्तीची जमावाने हत्त्या केली होती. तेंव्हाही याच बॉलीवूडच्या लोकांनी अखलाखच्या वेळी ज्या प्रकारे अश्रू ढाळले होते त्याच प्रकारे अश्रू ढाळले होते.

अशा वेळेला जमावाने केलेल्या हत्त्येवर (मॉब लिंचिंग) प्रखरतेने बोलणारे आणि त्याचा विरोध करणारे बॉलीवूड सेलिब्रेटी आज गप्पा का? असा प्रश्न नक्कीच पडतो.

Exit mobile version